रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिश्चन आणि त्याची गरोदर जोडीदार जॉर्जिया डन यांना आयपीएल २०२१ च्या एलिमिनेटर सामन्यानंतर टीकेचा समाना करावा लागतोय. या एलिमिनेटर सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून बंगळुरुचा पराभव झाल्याने चाहते डॅनियलवर संतापले आहेत. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला ४ गड्यांनी धूळ चारत स्पर्धेबाहेर काढलं. या सामन्यामध्ये डॅनियलला फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्येही विशेष चमक दाखवता आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फलंदाजी करताना डॅनियलला आठ चेंडूंमध्ये केवळ नऊ धावा करता आल्या. त्यानंतर तो धावबाद झाला. फिरकीपटू सुनील नरिनने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर कोलकात्याने बंगळुरुला २० षटकात ७ बाद १३८ धावांवर रोखले. त्यानंतर नरेनने फलंदाजीमध्येही डॅनियलच्या गोलंदाजीवर पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार लगावले. डॅनियलने गोलंदाजीमध्ये शेवटच्या १.४ षटकांमध्ये १७.३९ च्या सरासरीने धावादिल्या. २९ धावा देऊन त्याला एकही बळी घेता आला नाही.

डॅनियलने आपल्या पहिल्या षटकामध्ये २२ धावा दिल्या. त्यामुळेच सामना कोलकात्याच्या बाजूने झुकला. आरसीबीच्या पराभवानंतर संघाच्या चाहत्यांनी पराभवासाठी डॅनियलला दोषी ठरत त्याच्यावर आणि त्याच्या गरोदर पार्टनरवर नको त्या शब्दात टीका केलीय.

या दोघांनाही इतकं ट्रोल करण्यात आलं की शेवटी डॅनियलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भात एक मेसेज पोस्ट केला. सोशल मीडियावर आरसीबीच्या चाहत्यांना पराभाव झाल्याने डॅनियल आणि त्याची जोडीदार जॉर्जियावर फारच टीका केली. या टोमण्यांमुळे डॅनियलला वाईट वाटलं आणि त्याने चाहत्यांना इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून या सर्वांमधून कृपया माझ्या पार्टनरला दूर ठेवा अशी विनंती केली.

“माझ्या पार्टनरच्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट वाचा. मला आजच्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र हा खेळाचा भाग आङे. कृपया तिला या सर्वांपासून दूर ठेवा,” असं डॅनियलने म्हटलं आहे.

डॅनियलच नाही तर ग्लेन मॅक्सवेलनेही अशापद्धतीने थेट ट्विटवरुन नको त्या भाषेत टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rcb vs kkr daniel christian asks fans to leave his pregnant partner and not to troll her scsg
First published on: 12-10-2021 at 16:35 IST