इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ही स्पर्धा खेळली जाईल. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फ्रेंचायझीचे ट्विटर हँडल हॅक झाले होते. आरसीबीने ट्विटरद्वारेच ही माहिती दिली आणि हॅक झाल्यानंतर केलेल्या ट्वीटबद्दल चाहत्यांची माफीही मागितली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या संघाची कामगिरी आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात खूप चांगली झाली आहे.

आरसीबीने ट्विटरवर लिहिले, ”डिअर 12th Man Army, काही काळापूर्वी आमचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते, आता आम्ही ते ठीक केले आहे. आम्ही हॅकर्सने केलेल्या ट्वीट्सचा निषेध करतो आणि हटवलेल्या कोणत्याही ट्वीट्सचे समर्थन करत नाही. गैरसोयीबद्दल क्षमस्व.”

 

टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्या ट्वीटनंतर आरसीबीच्या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आले. अकाऊंट हॅक झाल्यानंतरच हे ट्वीट करण्यात आले. चाहत्यांनी त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

हेही वाचा – PCBच्या अध्यक्षपदी निवड होताच रमीझ राजांनी केलं पाकिस्तानी खेळाडूंना खूश; घेतला ‘धमाकेदार’ निर्णय!

आरसीबीला २० सप्टेंबर रोजी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. पहिल्या टप्प्यात आरसीबीने सात पैकी पाच सामने जिंकले होते. अशा प्रकारे, आरसीबी १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीच्या आधी गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आहेत.