शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएल २०२१च्या ४१ सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला ३ गड्यांनी मात दिली आहे. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील नरिनच्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्यांनी हा विजय आपल्या नावावर केला. मात्र या सामन्यानंतर दिल्लीने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली कॅपिटल्स आणि कर्णधार ऋषभ पंतने चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. पंतचा संघ गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यापासून दिल्ली फक्त एका विजयापासून दुर आहे. पंतने आज (मंगळवार) केकेआरविरुद्ध ३९ धावा केल्या. यासह तो दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने माजी अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवागला मागे सोडले.

KKR vs DC : कोलकातानं ‘दिल्ली’ जिंकली; ३ गडी राखून मिळवला विजय

ऋषभ पंतने ७९ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी ३६ च्या सरासरीने २३९० धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि १४ अर्धशतके केली आहेत. पंतचा स्ट्राइक रेट १४८ आहे. त्याने २१४ चौकार आणि १०९ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर वीरेंद्र सेहवागने दिल्लीसाठी २३८२ धावा केल्या आहेत. यामध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग टी -20 मधील धावांचा समावेश आहे. सेहवागने आयपीएलच्या ७९ सामन्यांमध्ये २९ च्या सरासरीने २१७४ धावा केल्या आहेत. एक शतक आणि १५ अर्धशतके केली. त्याचा स्ट्राइक रेट १६० होता. याशिवाय त्याने चॅम्पियन्स लीगच्या ७ सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने २०८ धावा केल्या आहेत. तसेच २ अर्धशतके केली. मात्र २०१४ पासून चॅम्पियन्स लीग खेळली गेली नाही.

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दिल्लीचे फक्त तीन फलंदाज २ हजारांहून अधिक धावा करू शकले आहेत. यामध्ये  ऋषभ पंत आणि वीरेंद्र सेहवाग व्यतिरिक्त श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. अय्यरने आतापर्यंत ८२ सामन्यांमध्ये ३२ च्या सरासरीने २२९१ धावा केल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतके केली आहेत. त्याने ९६ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. स्ट्राइक रेट १२६ आहे. १९२ चौकार आणि ८७ चौकार मारले आहेत. अन्य कोणत्याही फलंदाजाला २ हजार धावांचा टप्पा गाठता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rishabh pant breaks virender sehwag record srk
First published on: 28-09-2021 at 20:29 IST