आयपीएलच्या उर्वरित हंगामामध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस वाढलेली असतानाच मंगळवारी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सचा पराभव केला. या विजयासोबतच मुंबईच्या प्ले ऑफ्सच्या आशा कायम आहेत. स्पर्धेमधील चुरस वाढत असतानाच मैदानामधील तापमानही चांगलच तापल्याचं चित्र दिसत आहेत. अनेक सामन्यांमध्ये परस्पर विरोधी संघातील खेळाडूंचे एकमेकांशी खटके उडत आहेत. असं असतानाच मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पंड्याच्या एका कृतीने चाहत्यांची मन जिंकली असून त्यांच्या खिळाडूवृत्तीला अनेकजण सलाम करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यातील सहाव्या षटकामध्ये एक विचित्र प्रकार घडला. कृणाल पंड्या गोलंदाजी करत असताना ख्रिस गेलने एक जोरदार फटका लगावला. मात्र हा चेंडू नॉन स्ट्राइक्स एण्डला असणाऱ्या के. एल. राहुलला लागला. चेंडू राहुलला लागून गोलंदाजी करणाऱ्या क्रृणालकडे गेला आणि क्रृणालने लगेच तो स्टम्पकडे ढकलत राहुलला धावबाद केल्याची अपील केली. मात्र एकीकडे चेंडू लागल्याने राहुलला वेदना होत असल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरोधात अपील करताना दिसलं.

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: मुंबईने विजय मिळवला पण…; पाहा कोणते संघ निश्चित अन् कोणते तळ्यात मळ्यात

ही गोष्ट लक्षात येताच लगेच कृणालने त्याचं अपील मागे घेतलं. तसेच कर्णधारालाही इशारा करुन अपील करत तिसऱ्या पंचांपर्यंत न जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईसाठी करो या मरोची स्थिती असणाऱ्या या सामन्यामध्ये कृणाल दाखवलेल्या या खेळाडू वृत्तीचं कौतुक केलं जात आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांसाठीचा इशारा हाताने केल्यानंतर रोहितनेही या प्रसंगी आपल्याला अपील करायची नाही असं पंचांना इशाऱ्याने सांगितलेलं. विशेष म्हणजे यासाठी मुंबईने के. एल. राहुल सारख्या स्फोटक फलंदाजाला जीवदान दिलं.

ही कृती पाहून राहुलही प्रभावीत झाला आणि त्याने रोहितला थम्ब्सअप दाखवून आभार मानले. रोहितनेही हसून त्याचा स्वीकार केला. या कृतीसाठी रोहित आणि कृणालवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

१)

२)

३)

मुंबईने हा सामना जिंकत २ गुणांची कमाई करुन १० गुण मिळवले आहेत. मुंबईला प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 rohit sharma and krunal pandya display great sportsmanship in mi vs pbks game scsg
First published on: 29-09-2021 at 09:01 IST