आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं आपल्या आक्रमक खेळीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आक्रमक खेळी करत त्याने या आयपीएल पर्वातलं पहिलं शतकं झळकावलं आहे. त्याने पंजाबविरुद्ध ६३ चेंडूत ११९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राजस्थाननं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संजू सॅमसनचा सिंहगर्जनेतला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक सिंह शिकारीसाठी कसा आक्रमक असतो ते दिसतंय. या व्हिडिओला नेटकरी पसंती देत असून त्याच्या दिल्लीविरुद्धच्या आक्रमक खेळीची वाट बघत आहेत.

संजू सॅमसनचं आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये तीन शतकी खेळी केल्या आहेत. तर कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू आहे. राजस्थानसाठी आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी अजिंक्य रहाणे (२८१०) आणि शेन वॉटसनने (२३७२).ही कामगिरी केली आहे.

IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?

कर्णधार संजू सॅमसननं शतकी खेळी केली तरी पंजाबविरुद्धचा सामना अवघ्या ४ धावांना गमवावा लागला. त्यामुळे आयपीएल गुणतालिकेत राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचलाय. त्यामुळे दिल्लीविरुद्ध विजयाची नोंद करुन गुणतालिकेत वर येण्याचा राजस्थानचा प्रयत्न असणार आहे.