आयपीएल २०२१ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहलीने टी २० मध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात १३ धावा केल्यानंतर त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत हा विक्रम चार खेळाडूंच्या नावावर आहे. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेविड वॉर्नरच्या नावावर टी २० क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम आहे. यापूर्वी विराट कोहली आयपीएलमध्ये ६ हजारपेक्षा जास्त धावा करणारा एकमेक खेळाडू ठरला आहे. ३१३ टी-२० सामन्यांमध्ये कोहलीने भारतासाठी ९० आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी २०२ सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३१५९ धावा केल्या आहेत, तर आयपीएलमध्ये ६ हजारांहून अधिक धावा आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ५ शतके आणि ७३ अर्धशतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी २० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ख्रिस गेल- १४,२६१ धावाकिरोन पोलार्ड- ११,१७४ धावाशोएब मलिक- १०,८०८ धावाडेविड वॉर्नर- १०,०१७ धावाविराट कोहली- १०,०००* धावा विराट कोहलीने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत १० हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी १० हजार धावा करण्यासाठी त्याला १३ धावांची आवश्यकता होती. विराट कोहलीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर ९,३४८ धावा आहेत. तर सुरेश रैनाच्या नावावर ८,६३२ धावा आहेत. रोहित शर्माने ३५१ सामन्यात ३३८ डावात ९,३४८ धावा केल्या आहेत. या दरम्यान रोहितच्या नावावर सहा शतक आणि ६५ अर्धशतकांचा समावेश आहे. दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंडया, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कप्तान), देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅन ख्रिश्चन, केएस भरत, काईल जेमिसन, मोहम्मद सिराज, यजु्र्वेंद्र चहल, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल.