भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा केली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सामील होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संजीव गोयंकाचा आरपीएसजी समूह आणि CVC कॅपिटल यांनी अदानी आणि मँचेस्टर युनायटेडची मालक असलेल्या ग्लेझरला बाहेर ढकलत दोन नवीन संघांची बोली जिंकली आहे. आरपीएसजी समूह लखनऊ तर CVC कॅपिटल अहमदाबाद संघांचा मालक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सोमवारी दुबईमध्ये टीम बिडिंग प्रक्रियेनंतर या संघांची घोषणा झाली. आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली.CVC कॅपिटलने ५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे आणि दोन नवीन संघांच्या समावेशासह, बीसीसीआयला एकरकमी मोठी रक्कम मिळणार आहे. पुढील हंगामापूर्वी डिसेंबर २०२१मध्ये मेगा लिलाव होणार आहे.

आतापर्यंत, मुंबई इंडियन्स स्पर्धेत सर्वात यशस्वी फ्रेंचायझी राहिली आहे, त्यांनी एकूण पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई सुपर किंग्जने चार जेतेपदे पटकावली आहेत. या संघावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा – IND vs PAK : ‘‘आम्हाला कधी पाकिस्तानात जायला सांगितलं नाही”, मोहम्मद शमीला शिवीगाळ करणार्‍यांवर ओवेंसींसह सेहवाग-इरफान बरसले!

प्रत्येक संघाला १४ ते १८ सामने खेळावे लागतील.

संघांची संख्या वाढल्याने, प्रत्येक संघाला १४ किंवा १८ लीग सामने खेळावे लागतील. प्रत्येक फ्रेंचायझीला घरच्या मैदानावर ७ सामने आणि दूरच्या मैदानावर ७ सामने खेळावे लागतात. सध्या प्रत्येक संघाला प्रत्येकी ७ सामने खेळायला मिळतात. पण संघांच्या वाढीमुळे, जर प्रत्येक संघाला १८ सामने खेळायचे असतील, तर स्पर्धेचा कालावधी वाढेल. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावर परिणाम होईल. लीग सामन्यांची संख्या ७४ किंवा ९४ असू शकते. पुढील हंगामात फक्त ७४ सामने होतील. संघांना २ गटांमध्ये विभागले जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 auction new two teams announced adn
First published on: 25-10-2021 at 19:29 IST