scorecardresearch

Premium

IPL 2022 : अरे बापरे..! चेन्नई सुपर किंग्जसाठी धोक्याचा इशारा; आता काय करणार धोनी?

IPLचा १५वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे.

Ipl 2022 Deepak Chahar May Be Out Of Ipl 15th Season report
महेंद्रसिंह धोनी

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्याआधी चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी आली आहे. स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरला स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. चहरला चेन्नईने लिलावात १४ कोटी रुपयांना विकत घेतले. तो संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात चहरला हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे संघातून वगळण्यात आले.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी (२० फेब्रुवारी) खेळला गेला. त्याने १.५ षटकात १५ धावा देत दोन गडी बाद केले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्याला टाकता आला नाही. हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे चहरही जमिनीवर कोसळला आणि नंतर फिजिओसोबत बाहेर पडला. यानंतर चहर मैदानात परतला नाही.

disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
inmate escaping from Sassoon Hospital
पुणे : ‘ससून’मध्ये अनागोंदी कारभार! विभागीय आयुक्त झाडाझडती घेणार
19th Asian Games 2023 Updates
Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित
Asian Games 2023 IND vs MAL: Shafali Verma's brilliant half-century Team India set a challenge of 177 runs in front of Malaysia
Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला

टाइम्स ऑफ इंडियानुसार, चहर आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल २०२२ मधून बाहेर पडू शकतो. चहरची दुखापत गंभीर असून तो किमान दोन-तीन महिने बाहेर राहू शकतो. जर चहर स्पर्धेबाहेर झाला तर फ्रेंचायझी आणि त्याच्यासाठी हा मोठा धक्का असेल. लिलावात चार संघांनी त्याच्यासाठी बोली लावली होती. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स चहरला विकत घेऊ इच्छित होते. शेवटी चेन्नईला यश मिळाले. राजस्थानने १३.७५ कोटी रुपयांची अंतिम बोली लावली होती.

हेही वाचा – India vs Sri Lanka: वेस्ट इंडीजनंतर आता श्रीलंका मोहीम..! जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

चहर वेळेत तंदुरुस्त होईल आणि स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीसाठी उपलब्ध असेल अशी आशा चेन्नई संघ व्यवस्थापनाला आहे. चहरशिवाय सूर्यकुमार यादवलाही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. तो टीमसोबत लखनऊला गेला होता, पण तिथे पोहोचताच तो जखमी झाला. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंच्या बदली खेळाडूंची घोषणा केलेली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 deepak chahar may be out of ipl 15th season report adn

First published on: 24-02-2022 at 14:54 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×