IPL 2022 Final GT vs RR Final Highlights : गुजरात टायटन्स आयपीएलचा नवीन ‘चॅम्पियन’, राजस्थानचा केला पराभव

GT vs RR IPL 2022 Final Live Updates : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जात आहे.

IPL 2022 Final GT vs RR live
GT vs RR IPL 2022 Final Match Updates

IPL 2022, GT vs RR Final Live : इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा १५वा हंगामाला नवीन विजेता मिळाला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून परावभ केला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आणि शुभमन गिलची संयमी खेळीच्या बळावर गुजरातने आयपीएलचे विजेतपद आपल्या नावे केले आहे.अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने राजस्थानच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधी न देता त्यांना १३० धावांवर रोखले होते. त्यामुळे आयपीएल २०२२ स्पर्धेचे विजेतपद मिळवण्यासाठी गुजरातला १३१ धावांचे माफक आव्हान मिळाले होते.

Live Updates
23:27 (IST) 29 May 2022
गुजरात टायटन्सच्या संघाचे शतक पूर्ण

गुजरात टायटन्सच्या संघाने आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात आपला धावफलक शंभरी पार नेला आहे. गुजरातच्या संघाला आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत आहे.

23:16 (IST) 29 May 2022
कर्णधार हार्दिक पंड्या बाद

युजवेंद्र चहलने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केले आहे. यशस्वी जयस्वालने त्याचा झेल टीपला. पंड्याने ३० चेंडूमध्ये ३४ धावा केल्या.

https://platform.twitter.com/widgets.js

22:59 (IST) 29 May 2022
गुजरात टायन्सचे अर्धशतक पूर्ण

आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये गुजरात टायन्सचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. १० षटकांमध्ये गुजरातने दोन बाद ५४ धावांपर्यंत मजल मारली.

22:34 (IST) 29 May 2022
मॅथ्यू वेडच्या रुपात गुजरातला दुसरा झटका

ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड बाद झाला असून संघाची अवस्था दोन बाद २३ अशी झाली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

22:18 (IST) 29 May 2022
प्रसिद्ध कृष्णाने घेतला गुजरातचा पहिला बळी

गुजरात टायटन्सचा सलामीवीर वृद्धीमान साहा अवघ्या पाच धावा करून माघारी परतला आहे.

प्रसिद्ध कृष्णाने त्याला त्रिफळाचित केले.

22:09 (IST) 29 May 2022
गुजरात टायटन्सच्या डावाला सुरुवात

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचे सलामीवीर मैदानात उतरले आहे. शुभमन गील आणि वृद्धीमान साहा यांनी डावाची सुरुवात केली.

21:41 (IST) 29 May 2022
राजस्थानची अवस्था सात बाद ११२

ट्रेंट बोल्टच्या रुपात राजस्थान रॉयल्सचा सातवा गडी बाद झाला आहे. साई किशोरच्या चेंडूवर राहुल तेवतियाने त्याचा झेल टिपला.

21:35 (IST) 29 May 2022
राजस्थान रॉयल्सचे शतक पूर्ण

राजस्थान रॉयल्स संघाने आपले शतक पूर्ण केले आहे. पहिले सहा फलंदाज बाद झाल्यामुळे
संजू सॅमसनचा संघ संकटात सापडला आहे.

21:26 (IST) 29 May 2022
राजस्थानच्या संघाची पडझड सुरू

आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ संकटात सापडला आहे. राजस्थानच्या संघातील सर्व भरवशाचे फलंदाज माघारी परतले असून गुजरातच्या संघाने सामन्यावर मजबूत नियंत्रण मिळवले आहे. १५ षटकांमध्ये राजस्थानची अवस्था पाच बाद ९४ अशी झाली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

21:09 (IST) 29 May 2022
मागील सामन्यातील शतकवीर जोस बटलर बाद

राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलर बाद झाला आहे. टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला जोसला माघारी धाडले. हा राजस्थानच्या संघासाठी सर्वात मोठा झटका आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

21:05 (IST) 29 May 2022
देवदत्त पडिक्कल अडकला राशीद खानच्या जाळ्यात

गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशीद खानने राजस्थानला तीसरा झटका दिला. देवदत्त पडिक्कल अवघ्या दोन धावा करून माघारी परतला.

20:53 (IST) 29 May 2022
दहा षटकांमध्ये राजस्थानची ७१ धावांपर्यंत मजल

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात दहा षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने दोन गड्यांच्या बदल्यात ७१ धावा केल्या आहेत.

20:45 (IST) 29 May 2022
टायटन्सच्या कर्णधाराने घेतला रॉयल्सच्या कर्णधाराचा बळी

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला बाद केले आहे. साई किशोरने संजूचा झेल टिपला.

20:39 (IST) 29 May 2022
राजस्थान रॉयल्सचे अर्धशतक पूर्ण

राजस्थान रॉयल्स संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. सध्या मैदानावर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन खेळत आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

20:32 (IST) 29 May 2022
पावरप्लेनंतर राजस्थान १ बाद ४५

पावरप्लेच्या सहा षटकांमध्ये राजस्थानने १ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे.

20:27 (IST) 29 May 2022
पाच षटकांत राजस्थानच्या एक बाद ३७ धावा

आयपीएलच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने एक बाद ३७ धावा केल्या आहेत.

20:22 (IST) 29 May 2022
राजस्थानला पहिला झटका

सलामीवीर यशस्वी जयस्वाल २२ धावा करून बाद झाला आहे. यश दयालने राजस्थानचा पहिला बळी मिळवला.

20:00 (IST) 29 May 2022
राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात

राजस्थान रॉयल्सच्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर मैदानात उतरले आहेत.

19:56 (IST) 29 May 2022
सामन्यापूर्वी झाले राष्ट्रगीताचे गायन

आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

19:42 (IST) 29 May 2022
गुजरातच्या संघात अलझारी जोसेफच्या जागी लोकी फर्ग्युसनला संधी

आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने अलझारी जोसेफच्या जागी लोकी फर्ग्युसनला संधी देण्यात आली आहे. तर, राजस्थान रॉयल्सने आपल्या संघामध्ये काहीही बदल केलेले नाहीत.

19:33 (IST) 29 May 2022
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा निर्णय

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर, गुजरात टायटन्स गोलंदाजी करेल.

https://platform.twitter.com/widgets.js

19:10 (IST) 29 May 2022
जय हो या गाण्याने समारोप सोहळ्याची सांगता

ए आर रहमान यांच्या जय हो या गाण्याने झाली समारोप सोहळ्याची सांगता. याच गाण्याच्या तालावर ठेका धरताना दिसला यशस्वी जयस्वाल

19:05 (IST) 29 May 2022
अंतिम सामन्याला अभिनेता अक्षय कुमारची हजेरी

आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारदेखील आहे. तो सध्या समारोप सोहळ्याचा आनंद लुटतोय.

18:58 (IST) 29 May 2022
वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण स्टेडियम दणाणले

संगीतकार ए आर रहमान यांच्या वंदे मातरम् या गाण्याने संपूर्ण मैदानात देशभक्तिचे वातावरण निर्माण झाले आहे.

18:55 (IST) 29 May 2022
रणवीर सिंगच्या नृत्यानंतर आता प्रेक्षकांवर ए आर रहमानच्या संगीताची जादू

अकादमी पुरस्कार विजेता संगीतकार ए आर रहमान यांच्या सुमधुर संगीताने अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. ए आर रहमान यांच्यासोबत गायिका नीती मोहन, मोहित चौहान आणि इतर गायक सादरीकरण करत आहेत.

18:46 (IST) 29 May 2022
अभिनेता रणवीर सिंगचे धमाकेदार नृत्यप्रदर्शन

आयपीएलच्या समारोप कार्यक्रमामध्ये रणवीर सिंगचे धमाकेदार नृत्यप्रदर्शन सुरू झाले आहे. प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

18:33 (IST) 29 May 2022
आयपीएल २०२२ भव्य समारोप सोहळ्याला सुरुवात

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२२ भव्य समारोप सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

Web Title: Ipl 2022 final gt vs rr final match live updates vkk

Next Story
…अन् द्रविड गुरुजी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले; संजू सॅमसनच्या रिसेप्शनचा Video होतोय व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी