scorecardresearch

IPL 2022 : हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स संघानं लाँच केला लोगो; पाहा VIDEO

आशिष नेहरा गुजरात संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

ipl 2022 gujarat titans Official Logo launch
गुजरात टायटन्स आणि हार्दिक पंड्या

आयपीएल २०२२ची नवीन फ्रेंचाइजी असलेल्या गुजरात टायटन्सचा अधिकृत लोगो जारी करण्यात आला आहे. फ्रेंचायझीचा लोगो त्रिकोणाच्या आकारात ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे गुजरात संघाचे नेतृत्व असेल तर आशिष नेहरा संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

गुजरातने फ्रेंचायझीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्वीट केला आहे, ज्यामध्ये संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या, प्रशिक्षक आशिष नेहरा आणि युवा फलंदाज शुबमन गिल डिजिटल अवतारात दिसत आहेत.

हेही वाचा – IPLनं डावललं टीम इंडियानं सावरलं..! भारतीय संघात निवडला गेलेला सौरभ कुमार नक्की आहे तरी कोण?

यंदाच्या आयपीएलमध्ये आठऐवजी एकूण १० संघ खेळणार आहेत. बीसीसीआयने गेल्या वर्षी २५ ऑक्टोबरला आयपीएलसाठी दोन नवीन संघांची घोषणा केली होती. अहमदाबादला सीव्हीसी कॅपिटल्सने ५६२५ कोटी रुपयांना विकत घेतले. लखनऊ संघाने गेल्या महिन्यातच त्यांचे अधिकृत नाव जाहीर केले होते. हा संघ लखनऊ सुपरजायंट्स म्हणून ओळखला जाईल. तर अहमदाबादने आपल्या संघाला गुजरात टायटन्स असे नाव दिले.

गुजरात टायटन्स संघ – हार्दिक पंड्या, राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डोमिनिक ड्रेक, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान डेविड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, वरुण आरोन, बी साई सुदर्शन.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 gujarat titans official logo launch adn

ताज्या बातम्या