IPL 2022 Mega Auction : ख्रिस गेलसह ‘या’ दिग्गज खेळाडूंची लीगमधून माघार!

मेगा ऑक्शनसाठी नाव पाठवलेल्या खेळाडूंबाबत खुलासा झाला आहे.

IPL 2022 Mega Auction List of all players who registerd
आयपीएल आणि ख्रिस गेल

आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनची (IPL 2022 Mega Auction) क्रिकेट चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागली आहे. हळूहळू या ऑक्शनशी संबंधित माहिती समोर येत आहे. आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. या हंगामात यावर्षी ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. यामुळे यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, मेगा ऑक्शनसाठी नाव पाठवलेल्या खेळाडूंबाबत खुलासा झाला आहे. आगामी आयपीएल ऑक्शनसाठी एकूण १२१४ खेळाडूंनी नावे दिली आहेत. ज्यात ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. फ्रेंचायझींना अंतिम यादीतून २५ खेळाडू निवडण्याची मुभा असेल. दरम्यान, काही बड्या खेळाडूंबद्दलही बातमी समोर आली आहे, जे मेगा ऑक्शनमध्ये सहभागी होणार नाहीत.

क्रिकबजच्या (cricbuzz) मते, इंग्लंडच्या बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जो रूट यांनी त्यांची नावे आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी पाठवली नाहीत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही या लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलनेही लिलावासाठी आपले नाव नोंदवलेले नाही. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रूटने आयपीएलमध्ये न खेळण्याचे आधीच सांगितले होते, परंतु इतर खेळाडूंची अनुपस्थिती आश्चर्यकारक आहे.

१२१४ नावांपैकी ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळाडू आहेत. या यादीत नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, ओमान, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स यांसारख्या सहयोगी देशांतील अनुक्रमे २७० कॅप्ड, ९०३ अनकॅप्ड आणि ४१ खेळाडूंचा समावेश आहे. अमेरिकेचे १४ खेळाडूही आहेत. १८ देशांतील ३१८ परदेशी खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाचे ५९, दक्षिण आफ्रिकाचे ४८, वेस्ट इंडिजचे ४१, श्रीलंकेचे ३६, इंग्लंडचे ३०, न्यूझीलंडचे २९, अफगाणिस्तानचे २०, नेपाळचे १५ खेळाडू आहेत. बांगलादेश (९), नामिबिया (५), ओमान आणि आयर्लंड (प्रत्येकी ३), झिम्बाब्वे (२) या देशाच्या क्रिकेटपटूंनी आयपीएल २०२२ साठी नोंदणी केली आहे.

हेही वाचा – Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा (२ कोटी रुपये) आणि लुंगी एनगिडी (५० लाख रुपये) आणि मार्को जानसेन (५० लाख रुपये) या खेळाडूंनीही लिलावासाठी आपली नावे नोंदवली आहेत. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्होने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये २ कोटींची मूळ किंमत ठेवली आहे. आयपीएल २०२२चा लिलाव १२ आणि ३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्सचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतनेही नोंदणी केली असून त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये ठेवली आहे. पहिल्यांदाच भूतानच्या खेळाडूने नोंदणी केली आहे

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 mega auction list of all players who registerd adn

Next Story
Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स
फोटो गॅलरी