IPL 2022 Qualifier 2, RR vs RCB Highlights : राजस्थान-बंगळुरूमधील ‘रॉयल’ लढतीमध्ये राजस्थान विजयी, अंतिम सामन्यात केला प्रवेश

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना

IPL 2022 Qualifier 2, RR vs RCB Highlights : राजस्थान-बंगळुरूमधील ‘रॉयल’ लढतीमध्ये राजस्थान विजयी, अंतिम सामन्यात केला प्रवेश
IPL 2022 RR vs RCB Qualifier 2

इंडियन प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आज या स्पर्धेतील दुसरा क्वॉलिफायर सामना खेळवला गेला. राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून हा सामना आपल्या खिशात घातला आहे. सलामीवीर जोस बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थानने विजय मिळवत आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता अंतिम सामन्यात राजस्थानसमोर गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.

Live Updates
23:01 (IST) 27 May 2022
जोस बटलरचे शानदार शतक

राजस्थानचा सलामीवर जोस बटलरने शतक पूर्ण केले आहे. या हंगामातील त्याचे हे चौथे शतक ठरले आहे.

22:28 (IST) 27 May 2022
संजू सॅमसन पुन्हा एकदा ठरला वानिंदू हसरंगाचा बळी

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुन्हा एकदा वानिंदू हसरंगाच्या जाळ्यात अडकला. हसरंगाने संजूला २३ धावांवर बाद केले.

https://platform.twitter.com/widgets.js
22:06 (IST) 27 May 2022
जोस बटलरचे झटपट अर्धशतक पूर्ण

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने झटपट अर्धशतक पूर्ण केले. त्याने २४ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. हे त्याचे सलग दुसरे अर्धशतक आहे.

22:00 (IST) 27 May 2022
यशस्वी जयस्वाल बाद झाल्याने राजस्थानला पहिला झटका

आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केलेल्या राजस्थानला यशस्वी जयस्वालच्या रुपात पहिला झटका बसला आहे. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला

21:54 (IST) 27 May 2022
राजस्थान रॉयल्स संघाचे अर्धशतक पूर्ण

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी अवघ्या ४.४ षटकांमध्ये संघाचे अर्धशतक पूर्ण केले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

21:37 (IST) 27 May 2022
राजस्थान रॉयल्सच्या डावाला सुरुवात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर मैदानात उतरले आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

21:17 (IST) 27 May 2022
विजयासाठी राजस्थानसमोर १५८ धावांचे आव्हान

आयपीएल २०२२ स्पर्धेतील क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांमध्ये धावांपर्यंत मजल मारली आहे. रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूला धावफलक दीडशेपार नेण्यात यश आले. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्याने दहाव्या षटकानंतर बंगळुरूच्या फलंदाजीची पडझड झाली. राजस्थानच्यावतीने प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले.

20:48 (IST) 27 May 2022
अर्धशतकानंतर रजत पाटीदार बाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार अर्धशतक करून बाद झाला. त्याने ४२ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर जोस बटलरने सीमारेषेजवळ त्याचा झेल घेतला.

https://platform.twitter.com/widgets.js

20:45 (IST) 27 May 2022
रजत पाटीदारचे धमाकेदार अर्धशतक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदारने आपलं अर्धशतक साजरे केले आहे. त्याने चाळीस चेंडूमध्ये त्याने ५२ धावा केल्या.

20:39 (IST) 27 May 2022
ग्लेन मॅक्सवेलच्या रुपात आरसीबीला तिसरा झटका

रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बाद. ट्रेंट बोल्टने त्याला २४ धावांवर असताना माघारी धाडले.

20:22 (IST) 27 May 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार बाद

क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १०.४ षटकांमध्ये दोन बाद ७९ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार फॅफ डुप्लेसिसच्या रुपात संघाला दुसरा झटका बसला आहे. डुप्लेसिसला २५ धावा करून बाद झाला.

20:00 (IST) 27 May 2022
पावरप्लेमध्ये बंगळुरूच्या १ बाद ४६ धावा

क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची फलंदाजी सुरू असून पावरप्ले अखेर १ बाद ४६ धावा झाल्या आहेत. कर्णधार फॅफ डुप्लेसिस आणि रजत पाटीदार मैदानावर आहेत.

19:42 (IST) 27 May 2022
बंगळुरूला पहिला झटका, विराट कोहली बाद

क्वॉलिफायर २ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात वाईट झाली आहे. माजी कर्णधार विराट कोहली अवघ्या ७ धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने विराट कोहलीला यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडलं

19:30 (IST) 27 May 2022
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजीला सुरुवात

अहमदाबादमधील क्वॉलिफायर २ सामन्याच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलामीवीर विराट कोहली आणि फॅफ डु प्लेसिस मैदानात.

19:24 (IST) 27 May 2022
‘या’ खेळाडूंवरती असणार नजरा

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आपल्या संघामध्ये काहीही बदल केलेले नाहीत. पहिल्या डावामध्ये फलंदाजीमध्ये बंगळुरूच्या विराट कोहली, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकवर सर्वांच्या नजरा असतील. तर, राजस्थानचे आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट हे गोलंदाज भेदक मारा करणार का? याबाबतही उत्सुकता आहे.

19:07 (IST) 27 May 2022
राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल क्वॉलिफायर २ सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.

https://platform.twitter.com/widgets.js

Web Title: Ipl 2022 qualifier 2 rr vs rcb highlights vkk

Next Story
क्वॉलिफायर २ पूर्वी दिनेश कार्तिकला खावी लागली बोलणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
फोटो गॅलरी