IPL 2022: आरसीबी संघाला मिळाला नवा हेड कोच; ट्वीट करत केली घोषणा

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली आहे.

RCB_Match
IPL 2022: आरसीबी संघाला मिळाला नवा हेड कोच; ट्वीट करत केली घोषणा (File Photo/RCB)

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्य आयपीएल स्पर्धेत एकूण १० संघ असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारताची माजी अष्टपैलू आणि टीम इंडियाचा फलंदाज प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरसीबीने ट्वीट करत याबाबतची घोषणा केली आहे. दोन वर्षासाठी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बांगर यापूर्वी आरसीबीचे बॅटिंग कन्सल्टंट होते. आयपीएल २०२१ स्पर्धेत माइक हेसन यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली होती. यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीचं कर्णधारपद सोडल्याने आता पुढचा कर्णधार कोण असेल?, याबाबत खलबतं सुरू आहेत.

“आयपीएलमध्ये आरसीबीचा पहिला किताब जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. एवढ्या मोठ्या फ्रेंचाइजीचं मुख्य प्रशिक्षकपद मिळणं अभिमानाची बाब आहे. मी यापूर्वीच काही संघ सदस्यांसोबत काम केलं आहे. संघाची बांधणी करण्यासाठी अजून वाट पाहू शकत नाही. आयपीएलच्या मेगा ऑक्शन आणि लीगमध्ये खूप काम करण्याची गरज आहे. मला माहिती आहे, संघ व्यवस्थापन मला सहकार्य करतील. आम्ही एक चांगला निकाल देऊ आणि जगभरात असलेल्या चाहत्यांनी आनंदी करू.”, असं मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितलं.

बांगर हे २०१४ ते २०१९ या दरम्यान भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक होते. मात्र वर्ल्डकप २०१९ नंतर बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवला नाही. त्यांच्या जागेवर विक्रम राठोर यांनी नव्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2022 sanjay bangar rcb new head coach rmt

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या