IPL 2022: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स फ्रेंचाईसी दरम्यान वाद?; सोशल मीडियावर…

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

Sanju_Samson
IPL 2022: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स फ्रेंचाईसी दरम्यान वाद?; सोशल मीडियावर…(Photo- IPL)

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघ सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनचं काही तरी बिनसल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर अधिकृत असलेलं राजस्थान रॉयल्स संघाचं खातं संजू सॅमसननं अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. मात्र फ्रेंचाईसी आणि संजू सॅमसन या दोघांनी याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. संजू सॅमसननं राजस्थान रॉयल्सचं सोशल मीडिया खातं का अनफॉलो केलं?, याबाबत संघाला माहिती नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, फ्रेंचाईसीने संजू सॅमसनला पुढच्या सत्रासाठी प्राथमिकता दिली होती. मात्र संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स खेळण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. संजू सॅमसन आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण सॅमसननं चेन्नई सुपर किंग्सला सोशल मीडियावर फॉलो केलं आहे. सॅमसन चेन्नईसाठी धोनीचा पर्याय ठरू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माकडे कर्णधारपद, तर विराट कोहलीला आराम

आयपीएल २०२१ मध्ये संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली होती. १४ सामन्यात संजू सॅमसननं ४८४ धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. संजू सॅमसननं या पर्वात एकूण ४५ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2022 sanju samson may leave the franchise of rajasthan royals rmt

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या