इंडियन प्रीमियर लीगचा १६वा हंगाम सुरू होण्यास अजून बराच वेळ शिल्लक आहे, पण फ्रँचायझी आधीच त्यासाठी तयारी करत आहेत. लिलावापूर्वी, सर्व १० फ्रँचायझींना रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी सादर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (१५ नोव्हेंबर) आहे. त्यानुसार कोलकाता नाईट रायडर्स रिटेन्शन आणि सनरायझर्स हैदराबादने रिलीज-रिटेन केलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता नाईट रायडर्स –

केकेआर युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचला सोडू शकते. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सने दीर्घ फॉर्मेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्सने देखीव व्यस्त वेळापत्रकामुळे माघार घेतली आहे.लॉकी फर्ग्युसन आणि यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाज यांना कोलकाताने गुजरात टायटन्सकडून ट्रेड कराराद्वारे स्वाक्षरी केली. याशिवाय अॅरॉन फिंचही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार नाही.

केकेआर निश्चितपणे श्रेयस अय्यर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती या खेळाडूंना कायम ठेवेल. दोन वेळचा चॅम्पियन संघ नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग आणि उमेश यादव यांनाही आपल्या संघात ठेवू शकतो.

हेही वाचा – IPL 2023: किरॉन पोलार्ड आयपीएलमधून निवृत्त; आता मुंबई इंडियन्ससोबत दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत

अव्वल खेळाडू कायम: श्रेयस अय्यर, सुनील नरेन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, नितीश राणा, शेल्डन जॅक्सन, रिंकू सिंग, उमेश यादव

सोडले जाण्याची शक्यता: शिवम मावी, मोहम्मद नबी, चमक करुणारत्ने, रमेश कुमार, अजिंक्य रहाणे, अॅरॉन फिंच

सनराइज हैदराबाद –

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन आगामी मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळू शकणार नाही. फ्रेंचायझी विल्यमसनला सोडू शकते. याशिवाय शशांक सिंग, श्रेयस गोपाल, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड आणि सीन अॅबॉट हे खेळाडू हैदराबाद सोडू शकतात.

एसआरएचने कायम ठेवलेले खेळाडू: एडन मार्कराम, भुवनेश्वर कुमार, निकोलस पूरन, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, अब्दुल समदी, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराज, ग्लेन फिलिप्स आणि मार्को जॉन्सन.

सोडले जाण्याची शक्यता: केन विल्यमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 retention kkr and srh released retained players see the release retained players list and full squad vbm
First published on: 15-11-2022 at 16:14 IST