Head Coaches of 10 Teams in IPL: आयपीएलच्या १६व्या हंगामाबात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ३१ मार्चपासून आयपीएलचा १६ वा सीझन सुरू होत असून, त्यासाठी सर्व संघांचे कॅम्प सुरू झाले आहेत. यंदा प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावरही सामने खेळता येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. भारत आणि वनडे मालिकेनंतर दोन्ही संघांचे खेळाडू देखील आपापल्या संघात सामील होतील. मात्र यावेळी काही आयपीएल संघांचे मुख्य प्रशिक्षकही बदलण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सर्व १० संघांच्या मुख्य प्रशिक्षकांबद्दल जाणून घेऊया.

आयपीएल संघांचे मुख्य प्रशिक्षक –

१.चेन्नई सुपर किंग्स – स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंडचा माजी कर्णधार)
२.कोलकाता नाइट रायडर्स – चंद्रकांत पंडित (माजी भारतीय खेळाडू)
३.मुंबई इंडियन्स – मार्क बाउचर (माजी यष्टीरक्षक, दक्षिण आफ्रिका)
४.पंजाब किंग्स – ट्रेव्हर बेलिस (माजी इंग्लंड प्रशिक्षक)
५.गुजरात टायटन्स – आशिष नेहरा (माजी गोलंदाज भारत)
६.दिल्ली कॅपिटल्स – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार)
७.लखनौ सुपर जायंट्स – अँडी फ्लॉवर (माजी कर्णधार झिम्बाब्वे)
८.राजस्थान रॉयल्स – कुमार संगकारा (श्रीलंकेचा माजी कर्णधार).
९.रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – संजय बांगर (माजी फलंदाज भारत)
१०.सनरायझर्स हैदराबाद – ब्रायन लारा (माजी कर्णधार वेस्ट इंडिज)

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

आयपीएल २०२३ मध्ये तीन भारतीय प्रशिक्षक सहभागी –

आयपीएल २०२३ मध्ये १० संघ सहभागी आहेत, त्यापैकी सात संघांचे मुख्य प्रशिक्षक विदेशी आहेत. त्याचबरोबर उर्वरित तीन संघाचे मुख्य प्रशिक्षक भारतीय आहेत. ज्यामध्ये आशिष नेहरा गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आहे. त्याच्या प्रशिक्षणात गुजरातने २०२२ चे विजेतेपद पटकावले. दुसरे भारतीय प्रशिक्षक संजय बांगर हे यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक असतील.

हेही वाचा – MI Franchise: मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीमध्ये आणखी एका संघाची एंट्री; ‘या’ लीगमध्ये मैदान गाजवण्यास सज्ज

बांगर यांनी यापूर्वी पंजाबचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. तिसरे भारतीय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित हे कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक असतील. चंद्रकांत पंडित हे देशांतर्गत क्रिकेटमधील कोचिंगचे मास्टर मानले जातात. मध्य प्रदेशने गेल्या वर्षी रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद त्यांच्याच प्रशिक्षणात जिंकले होते.

यंदा या दोन संघांनी बदलले आपले मुख्य प्रशिक्षक –

यंदाच्या १६ व्या हंगामात सहभागी झालेल्या १० पैकी २ संघांनी आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहे. ज्यामध्ये पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत. पंजाबने अनिल कुंबळेच्या जागी ट्रेव्हर बेलिस यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २०१९ चा विश्वचषक जिंकला होता. तर सनरायझर्स हैदराबादने यावेळी वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.