IPL 2025 Franchises Want 2 Year Ban On Foreign Players : आयपीएल २०२५ च्या पार्श्वभूमीवर फ्रँचायझींचे संघमालक आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा पाहायला मिळाली. या बैठकीत संघमालकांनी परदेशी खेळाडूंबाबत बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलकडे एक मोठी मागणी केली आहे. लिलावात विकत घेतल्यावर कोणत्याही ठोस कारणाशिवाय हंगामासाठी अनुपलब्ध होणाऱ्या परदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालावी, कारण अशा खेळाडूंमुळे फ्रँचायझींचे मोठे नुकसान होते.

परदेशी खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी घालावी –

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या बैठकीत सर्व १० फ्रँचायझींनी दोन्ही मुद्यांवर आपली संमती दिली आहे. त्याबरोबर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने मोठ्या लिलावासाठी परदेशी खेळाडूंना नोंदणी करणे बंधनकारक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून या खेळाडूंना त्यांच्या सोयीनुसार मोठी रक्कम मिळण्याच्या आशेने छोट्या लिलावात सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर हंगाम सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक कारणांमुळे परदेशी खेळाडूंना अनुपलब्ध केल्याने आयपीएल फ्रँचायझी खूश नाहीत. फ्रँचायझींनी सांगितले की याचा त्यांच्या कामगिरीवरही परिणाम होतो. कारण संघाची रणनीती त्या परदेशी खेळाडूंना लक्षात घेऊन बनवली जाते.

fraud of 18 lakhs by luring tickets for World Cup matches
विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
Australia and Canada Visa Curbs Hit indian Students Hard
विश्लेषण : परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची कोंडी का? स्थलांतरितविरोधी भावनेचा फटका?
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

लिलावाच्या वेळी खेळाडूंच्या अनुपलब्धतेबद्दल माहिती मिळावी –

आयपीएल फ्रँचायझींनी सांगितले की, जर बोर्डाने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सांगितले किंवा ते जखमी झाले किंवा काही कौटुंबिक कामामुळे ते संघात सहभागी होऊ शकले नाहीत, तर अशा परिस्थितीत ते खेळाडूंना परवानगी देतील. पण लिलावाच्या वेळी खेळाडूंच्या अनुपलब्धतेबद्दल त्यांना माहिती असल्यास बरे होईल. फ्रँचायझींना ही समस्या भेडसावत आहे की अनेक वेळा मूळ किमतीत खरेदी केलेले खेळाडू लिलावानंतर त्यांची नावे माघारी घेतात. त्यांनी एका खेळाडूचे उदाहरणही दिले, ज्यामध्ये खेळाडूच्या मॅनेजरने अशी अट ठेवली होती की अधिक पैसे दिल्यास, तो खेळाडू त्या फ्रेंचायझीसाठी खेळण्यास तयार असेल.

हेही वाचा – IND vs SL: ‘IPL वाला रुल है क्या…’, केएल राहुलने वनडे सामन्यात रोहितला विचारला भलताच प्रश्न, VIDEO व्हायरल

फ्रँचायझींनी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलला असेही सांगितले की गेल्या दोन लिलावाच्या (२०१८-२४) दरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत. जेव्हा काही परदेशी खेळाडूं छोट्या लिलावात जास्त पैसा मिळवण्यासाठी मोठ्या लिलावात उपलब्ध राहिले नव्हते. यानंतर त्यांनी छोट्या लिलावांमध्ये मोठी रक्कम मिळवली होती. २०२२ च्या मोठ्या लिलावात इशान किशनसाठी सर्वाधिक बोली लावली गेली होती, मुंबई इंडियन्सने त्याला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर २०२४ साठी झालेल्या छोट्या लिलावात मिचेल स्टार्कला केकेआरने २४.७५ कोटी रुपयांना तर पॅट कमिन्सला एसआरएचने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले गेले.

हेही वाचा – IPL 2025 : रिटेन्शनच्या मुद्यावरून शाहरुख खान आणि नेस वाडियांमध्ये मतभेद; दिल्लीला नको इम्पॅक्ट प्लेयर

यातील काही खेळाडू आणि त्यांचे मॅनेजर या प्रणालीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी काही तरतुदी करण्याची गरज असल्याचे फ्रँचायझींनी सांगितले. फ्रँचायझींनी सांगितले की, एखाद्या नवीन खेळाडूने छोट्या लिलावासाठी नोंदणी केली, तर ते समजू शकतात परंतु मोठे खेळाडू मोठ्या लिलावासाठी उपलब्ध असले पाहिजेत. जर ते विकले गेले नाहीत तर अशा परिस्थितीत ते पुढील लिलावासाठी स्वतःची नोंदणी करू शकतात. आता या विविध मागण्यांवर आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल काय निर्णय घेते याची प्रतिक्षा करावी लागेल.