IPL 2025 Mega Auction Date and Venue Updates : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२५) च्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन आयोजित केला जाणार आहे. लिलावाचे ठिकाण आणि तारीख याबाबत बीसीसीआयने फ्रँचायझींशी सतत चर्चा करत आहे. बीसीसीआयने मेगा ऑक्शन आयोजित करण्यासाठी सर्व संभाव्य पर्यायांचा शोध घेतला आहे. यामध्ये सौदी अरेबियातील दोन शहरे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे मेगा ऑक्शनच्या जागेबाबत आणि तारीखेबद्दल लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.

बीसीसीआयने सौदी अरेबियातील रियाध आणि जेद्दाह या दोन शहरांची निवड केली आहे. यापूर्वी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना व्यतिरिक्त सिंगापूर, लंडन आणि दुबईच्या नावांचा विचार केला जात होता. बीसीसीआयने या शहरांबाबत खूप विचार केला, पण आता सौदी अरेबियाची दोन शहरे सर्वात पुढे आहेत. त्यामुळे आयपीएल २०२५ लिलाव रियाध किंवा जेद्दाह या शहरात आयोजित केला जाऊ शकतो. सध्या रियाध आघाडीवर असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

IPL 2025 Auction Likely To Be Held in Riyad on November 24 or 25 as Per Reports
IPL 2025 Auction: IPL 2025 बाबत मोठी अपडेट, ‘या’ तारखेला होऊ शकतो खेळाडूंचा लिलाव, ठिकाणाचे नावही आले समोर
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
IPL Auction 2025 Italian Player Thomans Jack Draca Registered First Time for Mega Auction Who Represented Mumbai indians
IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन
IPL 2025 MI Retention Team Players List
MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत
IPL 2025 Retention Date, Time and Free Live Streaming Details in Marathi
IPL 2025 Retention: IPL 2025 Retention Live मोफत कुठे पाहता येणार? दिवाळीदिवशी होणार रिटेन-रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

क्रिकबझच्या माहितीनुसार, बीसीसीआयने आधीच आपले अधिकारी सौदी अरेबियाला पाठवले आहेत. आणखी एक तुकडी सोमवारी (२१ ऑक्टोबर) तेथे पोहोचू शकते. दोन दिवसांचा लिलाव भारतात व्हावा अशी फ्रेंचायझीची इच्छा होती, परंतु पर्याय उपलब्ध नव्हता. आता ते बीसीसीआयने आयपीएल मेगा लिलावासाठी ठिकाण आणि तारीख निश्चित करण्याची वाट पाहत आहेत, जेणेकरून ते प्रवासाची व्यवस्था करू शकतील.

हेही वाचा – Womens T20 World Cup 2024 : विश्वविजेत्या न्यूझीलंडवर पैशांचा वर्षाव! भारतासह इतर संघांना किती मिळाली रक्कम? जाणून घ्या

आयपीएल लिलाव विरुद्ध पर्थ कसोटी?

आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शन नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे काही काळ बोलले जात होते. आता संभाव्य तारीख समोर आली आहे. आयपीएलचा मेगा ऑक्शन २५-२६ नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो. यादरम्याने भारत-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी (२२-२६ नोव्हेंबर) खेळली जाणार असल्याने अडथळा निर्माण झाला होता. दोन्ही एकाच दिवशी येत असल्याने बीसीसीआयला तारखांबद्दल काही शंका होती. मात्र, मंडळाने यावर तोडगा काढला आहे.

हेही वाचा – SA vs NZ : क्रिकेट जगताला मिळाला नवा विश्वविजेता! न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पटकावलं पहिलं जेतेपद

बीसीसीआयने यावर शोधला उपाय –

वास्तविक, डिस्ने हॉटस्टारकडे भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आणि आयपीएलचे प्रसारण हक्क आहेत. अशा स्थितीत दोन मोठ्या कार्यक्रमांची टक्कर होऊ शकते. गेल्या काही वर्षांत आयपीएल लिलाव हा एक मोठा कार्यक्रम ठरला आहे आणि लाखो लोक हा कार्यक्रम पाहतात. हे बीसीसीआयला माहीत आहे. या कारणांमुळे आयपीएलचा लिलाव दुपारी होणार आहे. अशा स्थितीत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दिवसाचा खेळ दुपारपर्यंत संपेल. त्यानंतर आयपीएलचा लिलाव सुरु होणार आहे.

Story img Loader