IPL 2025 Retention Date, Time and Free Live Streaming: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंच्या यादी संघांना जाहीर करायची आहे. बीसीसीआयने सर्व १० आयपीएल संघांना पुढील हंगामासाठी उद्या ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम तारीख दिली आहे. ३१ तारखेपर्यंत सर्व संघ बीसीसीआयकडे संघात कायम ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करतील.
३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशीच क्रिकेट चाहत्यांना कोणत्या संघाने कोणता खेळाडू संघात कायम ठेवला आहे आणि कोणाला वगळले आहे हे कळणार आहे. यासाठी एक खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी एका कार्यक्रमामध्ये संघांकडून जाहीर केली जाणार आहे, हा कार्यक्रम कुठे लाईव्ह पाहता येणार आहे, हे जाणून घेऊया.
हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
IPL 2025 साठी संघात कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण माहिती जिओ सिनेमावर दिली जाईल. यासाठी एक विशेष कार्यक्रम ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून जिओ सिनेमावर सादर केला जाणार असून त्याद्वारे रिटेन, रिलीज खेळाडूंची माहिती चाहत्यांना मिळणार आहे.
फ्रँचायझींना खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. संघांना जास्तीत जास्त ६ खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे १८ कोटी, १४ कोटी आणि ११ कोटी रुपये असेल. चौथ्या रिटेनशनसाठी १८ कोटी आणि पाचव्या रिटेंशनसाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या खेळाडूला कोणताही संघ अनकॅप्ड खेळाडू म्हणून ठेवू शकतो ज्यासाठी ४ कोटी रुपये किंमत असेल.
हेही वाचा – IPL 2025 लिलावापूर्वी किती खेळाडूंना रिटेन करता येणार? रिटेंशनचे संपूर्ण नियम वाचा एकाच क्लिकवर
इंडियन प्रीमियर लीग २०२५ रिटेंशनचे मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर घेऊ पाहता येणार आहे. जिओ सिनेमाने ३१ ऑक्टोबरला हा कार्यक्रम आपल्या प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहण्याची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला लिलाव असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.