IPL 2025 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेट प्रेमींसाठी गुडन्यूज समोर आली आहे. आयपीएल २०२५ कधीपासून सुरु होणार? आयपीएलचा अंतिम सामना अर्थात फायनल कधी रंगणार ? या तारखा समोर आल्या आहेत. सगळ्यांनाच आयपीएलचं पर्व कधी सुरु होणार? याची उत्सुकता होती. ज्यानंतर आता आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या बैठकीनंतर राजीव शुक्लांचा माध्यमांशी संवाद

रविवारी बीसीसीआयच्या सचिवपदी माजी क्रिकेटर देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटिया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल २०२५ विषयी महत्त्वाची माहिती दिली. येत्या २३ मार्चपासून आयपीएल सुरु होईल असं राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. २५ मे रोजी अंतिम सामना पार पडेल. राजीव शुक्ला यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Suresh Raina says If Rohit Sharma perform well we will see a different kind of captain before Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ”जर चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहितला सूर गवसला तर…”, माजी भारतीय खेळाडूचं हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
Union Budget 2025 Stock Market Trend
Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
Mahakumbh News Live Updates
Mahakumbh 2025 Stampede : “परिस्थिती नियंत्रणात, पण…”, चेंगराचेंगरीनंतर प्रयागराजमध्ये नेमकी स्थिती काय? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!

२०२४ मध्ये आयपीएल २२ मार्चला झालं होतं सुरु

मागील वर्षी आयपीएलचा थरार चांगलाच रंगला होता. २०२४ आयपीएलचे सामने २२ मार्च या दिवशी सुरु झाले. २०२४ मधला आयपीएल पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला होता. तर २६ मे रोजी या पर्वाचा अंतिम सामना खेळला गेला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला होता. २०२४ मधल्या आयपीएल ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपलं नाव कोरलं होतं. आता यावर्षीचा आयपीएलचा लिलाव नोव्हेंबर महिन्यात पार पडला आहे. तर राजीव शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे २१ मार्चपासून आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत.

हे पण वाचा- Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमची काय आहेत वैशिष्ट्यं? जाणून घ्या

WPL चा निर्णयही लवकरच घेतला जाईल-शुक्ला

दरम्यान राजीव शुक्ला यांनी आयपीएलसह WPL बाबतही माहिती दिली. WPL च्या सामन्यांचंही सगळं काही ठरलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल, असं शुक्ला यांनी सांगितलं. त्यामुळे यंदाच्या WPL मध्ये काय विशेष असणार तसेच आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोणामध्ये रंगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या १८ आणि १९ जानेवारी रोजी बीसीसीआयची पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत चर्चा होणार आहे, असंही शुक्ला यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader