IPL 2026 Auction Abu Dhabi Highlights: आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव आज दुबईमध्ये पार पडला. यामध्ये कॅमेरून ग्रीनवर सर्वाधिक २५.२० कोटींची बोली लागली आणि यासह तो केकेआरच्या ताफ्यात सामील झाला. कॅमेरून ग्रीन लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर मथिशा पथिरानालादेखील लॉटरी लागली. तर वेंकटेश अय्यर व रवी बिश्नोईसाठी चांगली बोली लागली. याशिवाय चेन्नई सुपर किंग्सने दोन सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू खरेदी केले आणि त्यासाठी संघाने २८ कोटी रूपये खर्च केले. पृश्वी शॉला अखेरीस दिल्लीने संघात सामील केलं. याशिवाय आयपीएलमध्ये नेमकं काय काय घडलं? खाली वाचा सविस्तर
IPL Auction 2026 Abu Dhabi Highlights, 16 December 2025: आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव आज १६ डिसेंबरला पार पडला, या लिलावाचे हायलाईट्स वाचा...
IPL Auction 2026: लिलावानंतर कसे आहेत सर्व १० संघ? वाचा प्रत्येक संघातील संपूर्ण खेळाडूंची यादी एकाच क्लिकवर
IPL Auction 2026 live: काईल जेमिसन
काईल जेमिसनने २ कोटींना दिल्ली कॅपिटल्सने संघात सामील केलं.
IPL Auction 2026 live: विहान मल्होत्रा
विहान मल्होत्रा व कनिष्क चौहान प्रत्येकी ३० लाखांना आरसीबीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.
विकी ओस्तवाल ३० लाखांना आरसीबीच्या ताफ्यात दाखल. पृथ्वी राज ३० लाखांना तर ल्यूक वूड प्रत्येक ७५ लाखांना गुजरात संघात सामील.
IPL Auction 2026 live: एडम मिल्न
एडम मिल्न २.४० कोटींना तर कुलदीप सेन ७५ लाखांना राजस्थान रॉयल्स संघात दाखल.
जॅक फोक्स ७५ लाखांच्या मूळ किंमतीला चेन्नईच्या ताफ्यात दाखल, टॉम बँटन गुजरात संघात २ कोटींना सामील.
पृथ्वी शॉने मूळ किंमतीसह अखेरीस पृथ्वी शॉला तिसऱ्या एक्सलेरेटेड राऊंडमध्ये खरेदी केलं. दीपक हुडा, जेमी स्मिथ, स्पेन्सर जॉन्सन, सनवीर सिंह अनसोल्ड राहिले.
ऑस्ट्रेलियाच्या जॅक एडवर्ड्ससाठी चेन्नई-गुजरात-हैदराबादचे संघ बोली लावत आहेत. हैदराबादने ३ कोटींना संघात केलं सामील
साहिल पारेख ३० लाखांना दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. विशाल निषाद ३० लाखांना पंजाब किंग्स संघाचा भाग. बृजेश शर्मा ३० लाखांना राजस्थानच्या ताफ्यात सामील.
मुंबई इंडियन्सने मयंक रावतला ३० लाखांना संघात केलं सामील, तर पंजाब किंग्सने प्रवीण दुबेला ३० लाखांना संघात खरेदी केलं.
IPL Auction 2026 live: अमन राव
अमन राव ३० लाखांना राजस्थानच्या ताफ्यात दाखल
IPL Auction 2026 live: लुंगी एनगिडी
लुंगी एनगिडी २ कोटींना दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
IPL Auction 2026 live: जोश इंग्लिस
जोश इंग्लिससाठी लखनौ व हैदराबादने बोली लावण्यास सुरूवात केली आहे. हैदराबादची पर्स संपेपर्यंत लखनौने बोली लावली. यासह जोस इंग्लिसला ८.६० कोटींना संघात सामील केलं.
IPL Auction 2026 live: जॉर्डन कॉक्स
जॉर्डन कॉक्सला आरसीबीने ७५ लाखांना संघात सामील केलं.
IPL Auction 2026 live: बेन द्वारशुईस
ऑस्ट्रेलियाच्या बेन द्वारशुईससाठी पुन्हा एकदा पंजाब वि. चेन्नई अशी चुरस रंगली आहे. चेन्नईने माघार घेतल्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावण्यास सुरूवात केली. पण अखेरीस पंजाब किंग्सने बाजी मारत ४.४० कोटींना द्वारशुईसला संघात सामील केलं आहे.
भारताचा फिरकीपटू राहुल चहरसाठी चेन्नई व पंजाब संघांमध्ये बोली लावली जात आहे. ४ कोटींच्या पलीकडे बोली पोहोचली असून चेन्नई राहुलसाठी पूर्ण तयार आहे. राहुल चहर ५.२० कोटींना चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल झाला आहे.
IPL Auction 2026 live: शिवम मावी
शिवम मावी ७१५ लाखांच्या मूळ किमतीसह हैदराबादच्या ताफ्यात दाखल
IPL Auction 2026 live: मॅट हेन्नी
मॅट हेन्रीला २ कोटींच्या मूळ किंमतीसह चेन्नईने आपल्या ताफ्यात केलं सामील.
रचिन रवींद्र व २ कोटींच्या मूळ किंमतीसह केकेआरच्या ताफ्यात दाखल. तर आकाशदीपला केकेआरने १ कोटींच्या मूळ किमतीसह संघात सामील केलं आहे.
अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनसाठी हैदराबाद व गुजरात यांच्यात बोली लावली जात आहे. त्यानंतर लखनौ बोली लावण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. हैदराबादने अखेरीस १३ कोटींना लियाम लिव्हिंगस्टोनला संघात सामील केलं आहे.
IPL Auction 2026 live: सर्फराझ खान
सर्फराझ खान ७५ लाखांसाठी चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.
अनसोल्ड खेळाडू
जेक फ्रेझर मॅकगर्क
पृथ्वी शॉ
दीपक हुडा
जेमी स्मिथ
अथर्व तायडे
राजवर्धन हंगरगेकर
कमलेश नागरकोटी
सनवीर सिंह
रूचित अहीर
आकाश मधवाल
मायकेल ब्रेसवेल
एडम मिल्ने
सलमान निजार
मनन वोहरा
रिचर्ड ग्लीसन
मनी ग्रेवाल
IPL Auction 2026 live: सार्थक रंजन
भारताचा अनकॅप्ड खेळाडू सार्थक रंजन, दक्ष कामरा प्रत्येकी मूळ किंमतीला ३० लाखांना संघात सामील.
इजाज सवारिया
जिक्कू ब्राईट
मणिशंकर पुरासिंह
प्रफुल्ल हिंगे व क्रेंस फुलेत्रा प्रत्येकी ३० लाखांच्या मूळ किंमतीसह हैदराबादच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
IPL Auction 2026 live: अथर्व अंकोलेकर
मुंबईकडून क्रिकेट खेळणारा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर ३० लाखांच्या मूळ किमतीसह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला.
IPL Auction 2026 live: अमित कुमार
भारताचा अनकॅप्ड फिरकीपटू अमित कुमार ३० लाखांच्या मूळ किंमतीसह हैदराबाद संघात सामील.
IPL Auction 2026 live: कुपर कोनॉली
ऑस्ट्रेलियाच्या कुपर कॉनोलीसाठी पंजाब व केकेआरने बोली लावली होती, अखेरीस ३ कोटींसाठी कुपर कॉनोलीला संघात सामील केलं आहे.
कॅप्ड खेळाडूंच्या यादीतील अनसोल्ड खेळाडू
डॅन लॉरेन्स
तस्किन अहमद
रिचर्ड ग्लीसन
अल्झारी जोसेफ
राईली मेरेडिथ
कॉनर एस्टरह्युजेन
नेथन स्मिथ
मोहम्मद इजहर ३० लाखांच्या मूळ किंमतीसह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल

TATA IPL 2026 Auction Live Updates: आयपीएल २०२६ मिनी लिलाव आज अबुधाबीमध्ये पार पडला. या लिलावात संघांनी ७७ खेळाडू संघात सामील केले.
