IPL 2026 Final Tickets Price And Booking Process: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ७३ सामने पूर्ण झाले आहेत. तर शेवटचा सामना म्हणजेच अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. जेतेपदासाठीचा सामना जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदाबादच्या नरेंद्रो मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे. दरम्यान हा सामना पाहण्यासाठीचं तिकीट कसं मिळवायचं आणि तिकिटाची किंमत किती? जाणून घ्या.

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या मैदानावर एकाच वेळी एक लाखाहून अधिक प्रेक्षक एकाच वेळी सामन्याचा आनंद घेऊ शकतात. सामना जरी ७:३० ला सुरु होणार असला, तरीदेखील प्रेक्षकांना ४:३० पासून मैदानात प्रवेश द्यायला सुरुवात केली जाईल. हा सामना पाहण्यासाठी तुम्ही तिकीटं District by zomato या अॅपवरुन किंवा वेबसाईटवरुन बुक करु शकता.

आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी तिकीट कसं बुक करायचं?

जर तुम्हाला गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणारा सामना पाहायचा असेल, तर यासाठी तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला District by zomato या अॅपवरुन किंवा वेबसाईटवरुन IPL २०२६ Final असं सर्च करावं लागेल.

तिकीट खरेदी कसं करायचं?

हे अॅप उघडल्यानंतर फायनलचा सामना सिलेक्ट करायचं, आपली माहिती भरायची, पैसे द्यायचे आणि तिकीट डाऊनलोड करायचं. त्यानंतर सामन्याच्या एक दिवसाआधी अहमदाबादच्या ठरलेल्या तिकीट काऊंटरवर जाऊन तिकीट घ्यायचं. तुम्ही एका अकाऊंटवरुन जास्तीत जास्त ४ तिकीटं बुक करु शकता. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. पण वय जर २ वर्षांहून अधिक असेल, तर तिकीट घेणं अनिवार्य आहे.

अंतिम सामना पाहण्यासाठी तिकिटांची रक्कम ही ५ हजार ते २,२०,००० रुपयांच्या घरात आहे. ही किंमत तुम्ही कोणत्या स्टँडचं तिकीट बुक केलं आहे, यावर अवलंबून असते. हॉस्पिटॅलीटी अॅक्सेस असलेल्या तिकिटाची रक्कम जास्त असते, कारण सीट आणि जेवनाचीही सोय असते. तर मागच्या स्टँडच्या तिकिटांची किंमत कमी असते.