Sunil Gavaskar On IPL Final: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला २० षटकांअखेर १५५ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान आयपीएलचा सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवायला हवा होता, असं मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.

आयपीएल २०२६ अंतिम सामना हा रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवायला हवं होतं, असं मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. कारण अंतिम सामना रविवारी पार पडला आणि गुजरात टायटन्सचा संघ शनिवारी रात्री उशिरा अहमदाबादमध्ये दाखल झाला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ३ दिवसाआधीच अहमदाबादमध्ये दाखल झाला. गुजरातचा संघ शनिवारी लवकर गुजरातमध्ये दाखल होणार होता, पण पावसामुळे गुजरातचा संघ प्रवास करू शकला नव्हता.

सुनील गावसकरांनी हे मत सामना सुरू होण्याआधी मांडलं होतं. ते म्हणाले, “खेळाडूंना विश्रांती करायची गरज असते, यात काहीच शंका नाही. तुमचं विमान केव्हा भरारी घेणार हे पण तुम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे भिती आणि चिंता होती. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. जे काही झालं, ते सर्व अचानक झालं. त्यामुळे मला तरी हेच वाटतं की, सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवायला हवा होता.”

क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. पण या सामन्यात गुजरात टायटन्सच्या खेळाडूंचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद ७५ धावा करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवून दिला.