Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४२ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव अवघ्या १५५ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली आहे.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. विराट कोहली आणि जेकब बेथेल ही जोडी स्वस्तात माघारी परतली. जेकब बेथेल अवघ्या ५ तर विराट कोहली २८ धावांवर माघारी परतला. देवदत्त पडिक्कलने ४० धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने १९ धावा केल्या. शेवटी टीम शेफर्डने १७, वेंकटेश अय्यरने १२ आणि भुवनेश्वर कुमारने १५ धावांची खेळी केली.

गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला साई सुदर्शन अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. पण त्यानंतर गिलने मिळून संघाचा डाव सांभाळला. जोस बटलरने ३९ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने १२ धावा केल्या. शेवटी गुजरात टायटन्सने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला.

गुजरातचा संघ गुणतालिकेत मजबूत स्थानी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ या हंगामातही तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केल्यानंतर गुजरात टायटन्सचा आत्मविश्वास वाढणार आहे. या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानी होता. आताही दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर गुजरातचा संघ देखील पाचव्या स्थानी कायम आहे. पण गुजरातने १० गुणांची कमाई केली आहे. गुजरातकडे आता टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पुढील सामना जिंकून गुजरातचा संघ टॉप ४ मध्ये प्रवेश करू शकतो.