आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीला या स्पर्धेत एकतर्फी सामने पाहायला मिळाले होते. पण आता शेवटच्या टप्प्यात एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसात प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते, हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याआधी गुणतालिकेत तळाशी असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का दिला आहे. दरम्यान या सामन्यानंतर कोणता संघ कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.
लखनौ सुपर जायंट्स संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला एका महिन्यानंतर विजयाची चव चाखता आली आहे. लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पावसाने बऱ्याचदा हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द होतोय की काय? असं चित्र होतं. पण पाऊस थांबला आणि सामना १९-१९ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने २०९ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २०३ धावा करता आल्या. यासह लखनौने हा सामना ९ धावांनी आपल्या नावावर केला.
लखनौ सुपर जायंट्स संघाला या विजयाचा फार काही फायदा झालेला नाही. पण एक गोष्ट मात्र घडली, हा संघ सर्धेतून पूर्णपणे बाहेर झालेला नाही. गुणतालिकेत सर्वात शेवटी असलेला लखनौचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. हा सामना गमावला असता, तर लखनौचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असता. लखनौ, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे तिन्ही संघ तळाशी आहेत.
या सामन्याचा गुणतालिकेवर फार काही परिणाम झालेला नाही. कारण लखनौचा संघ तळाशी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ टॉप ४ मध्ये आहे. हा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडे गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी होती. पण ही संधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गमावली आहे. १२ गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. तर पंजाब किंग्सचा संघ १३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने देखील १२ गुणांची कमाई केली आहे. हे चारही संघ प्लेऑफमध्ये जाण्याचे प्रबळ दावेदार आहेत.
