भारतात सध्या आयपीएलची रणधुमाळ सुरू आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहे. यासह रेकॉर्डचा पाऊस पाहायला मिळत आहे. हे २ महिने क्रिकेट चाहत्यांचं चांगलच मनोरंजन होतं. यादरम्यान हजारो क्रिकेट चाहते मैदानावर जाऊन क्रिकेट सामने पाहण्याचा आनंद घेतात. मैदानावर चिअर लीडर्स देखील असतात ज्या सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. दरम्यान लखनौच्या एकाना स्टेडियममध्ये असा काही प्रकार पाहायला मिळाला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही संघांच्या चिअर लीडर्स असतात, ज्या प्रत्येक चौकार – षटकारावर आणि विकेटवर सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. पण आयपीएलमध्ये चिअर लीडर्सच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह उपस्थि झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चिअर लीडर्स सेफ्टी नेट असलेल्या स्टेजवर डान्स करताना दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात चिअर लीडर्स स्टेडियममध्ये डान्स करताना दिसून येत आहेत. यादरम्यान प्रेक्षकांनी चिअर लीडर्सवर पैसे उधळले. ज्यावर त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर लिहिला होता. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, स्टेडियम प्रशासनाने खबरदारी घेऊन चिअर लीडर्ससाठी स्टेजवर सेफ्टी नेट बसवली आहे.

यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काहींचं मत जरा वेगळं आहे. आयपीएलमध्ये क्रिकेट असताना चिअर लीडर्स कशाला? अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनौचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत या स्पर्धेत ८ सामने खेळले आहेत. यापैकी लखनौला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ६ सामन्यांमध्ये लखनौला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौने आतापर्यंत ४ गुणांची कमाई केली आहे. तर नेट रनरेट -१.१०६ इतका आहे. लखनौचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. आणखी १-२ सामने गमावले, तर लखनौचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.