IPL 2026 Orange Cap List: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पहिल्या सामन्यात ऑरेंज कॅपच्या यादीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आतापर्यंत टॉप ५ मध्ये होता. पण तो आता टॉप ५ मधून बाहेर पडला आहे. दरम्यान कोण आहेत टॉप ५ फलंदाज? जाणून घ्या.
१) अभिषेक शर्मा
या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत तुफान फटकेबाजी केली आहे. अभिषेक शर्माने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ५४.२९ च्या सरासरीने ३८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २१२.२९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
२) केएल राहुल</strong>
दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने पंजाब किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलने १५० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांमध्ये ५९.५० च्या सरासरीने ३५७ धावा केल्या आहेत. तर १८७.८९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
३) वैभव सूर्यवंशी
वैभव सूर्यवंशी सुरुवातीपासूनच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप ५ फलंदाजांमध्ये टिकून आहे. १५ वर्षीय वैभवने आतापर्यंत ८ सामन्यांमध्ये ४४.६२ सामन्यांमध्ये ३५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २३४.८७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. २३४.८७ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
४) हेनरिक क्लासेन
सनरायझर्स हैदराबादचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ४९.८६ च्या सरासरीने ३४९ धावा केल्या आहेत. १४९.७९ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
५) शुबमन गिल
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. आतापर्यंत विराट कोहली पाचव्या स्थानी होता. गिलने ७ सामन्यांमध्ये ४७.१४ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत. १४८.६५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
