आयपीएल २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तरी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. पण नशिबाची साथ मिळत असल्याने दिल्लीला शेवटच्या षटकात सामना गमवावा लगत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्लीचा समान सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात दिल्लीचा संघ विक्रमी २२६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. हे आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केले आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दरम्यान या विजयानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय मिळवणं गरजेचं होतं. जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती. त्यापुढे केएल राहुल आणि पथूम निसांका या अनुभवी फलंदाजांच्या जोडीने पुढाकार घेतला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. दिल्लीने आतापर्यंत ९ पैकी ४ सामने जिंकले आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे ४ संघ टॉप ४ मध्ये आहेत. तर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.

राजस्थान रॉयल्सने या सामन्यातील पहिल्या डावात धावसंख्या उभारली होती. पण ही धावसंख्या सामना जिंकण्यासाठी पुरेशी नव्हतीम दिल्ली कॅपिटल्सने दिलेलं आव्हान ७ गडी राखून पूर्ण केलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला हा सामना गमवावा लागला. पण पराभव होऊनही राजस्थान रॉयल्सचा संघ टॉप ४ मध्ये कायम आहे. राजस्थान रॉयल्सचा हा १० सामन्यापैकी चौथा पराभव आहे. ६ गुणांसह राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत १२ गुणांची कमाई केली आहे. राजस्थान रॉयल्सने जर हा सामना जिंकला असता, तर गुणतालिकेत वर जाण्याची संधी होती. पण आता १२ गुणांवर समाधान मानावं लागलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचे देखील प्रत्येकी १२-१२ गुण आहेत.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेला वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर रियान परागने ९० आणि ध्रुव जुरेलने ४२ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २२५ धावांवर पोहोचवली. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलने ७५ धावांची खेळी केली. तर पथूम निसांकाने ६२ धावांची खेळी केली. दिल्लीने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.