RCB Fan Viral Video: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गुजरात टायटन्स संघावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिलं जेतेपद मिळवण्यासाठी १८ वर्ष वाट पाहावी लागली होती. आता सलग दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या विजयानंतर खेळाडूंसह चाहत्यांनी देखील जल्लोष केला. दरम्यान हैदराबादमध्ये क्रिकेट चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष करण्याची मर्यादा ओलांडली. चाहत्यांनी बस फोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लागोपाठ दुसऱ्या विजयानंतर जल्लोष होणं साहजिक होतं. पण जल्लोष करताना चाहत्यांनी मर्यादा ओलांडल्या. मध्यरात्री चाहते रस्त्यावर उतरले. चाहत्यांच्या हातात झेंडे होते, बॅनर होते. चाहत्यांनी प्रायव्हेट बस अडवली आणि त्यावर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे बसमध्ये असलेले प्रवासी घाबरले. पोलीसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.
या विजयाच्या जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पोलिसांना परस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एक तासाहून अधिकचा वेळ लागला. विजयाचा जल्लोष करणं साहजिक आहे, पण जल्लोषाचा इतरांना त्रास होत असेल तर ही अतिशय चुकीचं आहे. जर असं कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. ज्यांनी बसच्या काचा फोडल्या, त्यांचा सीसीटीव्ही फुटेज पाहून शोध घेतला जाणार आहे. यासह त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दमदार विजय
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सकडून वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरातने २० षटकांअखेर १५५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराटने नाबाद ७५ धावांची खेळी केली. तर वेकंटेश अय्यरने ३२ धावा केल्या. तर टिम डेव्हिडने २४ धावा केल्या. शेवटी विराटने षटकार मारुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दुसरा विजय मिळवून दिला. गुजरातने हा सामना १८ षटकात ५ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली.
