IPL 2026 Schedule Announced: बहुप्रतिक्षित आयपीएल २०२६ चं वेळापत्रक अखेरीस बीसीसीआयाने जाहीर केलं आहे. टी-२० विश्वचषक २०२६ वर सर्व चाहत्यांच्या नजरा असतानाही आयपीएलच्या वेळापत्रकाची सर्वांना प्रतिक्षा होती. आयपीएल जणू क्रिकेटप्रेमींसाठीचा सण असतो. टी-२० विश्वचषक सुरू असताना आयपीएल २०२६ सुरू होण्याची तारीख समोर जाहीर करण्यात आली होती. आयपीएल २०२६ येत्या २८ मार्चपासून खेळवली जाणार आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बीसीसीआयकडून उर्वरित वेळापत्रक जाहीर केलं जाईल. त्यामुळे आता आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक सध्या जाहीर केलं आहे.

आयपीएल २०२६ यंदा शनिवारपासून सुरू होत आहे आणि शनिवार-रविवारी एक-एक सामना होईल डबल हेडर नसणार आहे. सध्याचे वेळापत्रक २८ मार्च ते १२ एप्रिल पर्यंत आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पहिला सामना गतविजेत्या आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. पण चिन्नास्वामीच्या मैदानावर सामना होणार की नाही याचा निर्णय १३ मार्चल कमिटी घेणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना मुंबईत केकेआर विरुद्ध होणार आहे.

यंदाचा पहिला डबल हेडर सामना ४ एप्रिल रोजी खेळला जाईल. दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्यानंतर संध्याकाळी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होईल. दुसऱ्या दिवशी, रविवारी आणखी दोन सामने होतील. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३:०० वाजता होईल. त्यानंतर संध्याकाळी ७:०० वाजता आरसीबी आणि सीएसके यांच्यात सामना होईल.

आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक

२८ मार्च २०२६ (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हेदराबाद – बंगळुरू
२९ मार्च २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई
३० मार्च २०२६ (सोमवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, गुवाहाटी
३१ मार्च २०२६ (मंगळवार) – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुल्लानपूर
१ एप्रिल २०२६ (बुधवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, लखनौ
२ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
३ एप्रिल २०२६ (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई
४ एप्रिल २०२६ (शनिवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
४ एप्रिल २०२६ (शनिवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद
५ एप्रिल २०२६ (रविवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, हैदराबाद
५ एप्रिल २०२६ (रविवार) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, बेंगळुरू
६ एप्रिल २०२६ (सोमवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, कोलकाता
७ एप्रिल २०२६ (मंगळवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, गुवाहाटी
८ एप्रिल २०२६ (बुधवार) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
९ एप्रिल २०२६ (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता
१० एप्रिल २०२६ (शुक्रवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुवाहाटी
११ एप्रिल २०२६ (शनिवार) – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुल्लानपूर
११ एप्रिल २०२६ (शनिवार) – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
१२ एप्रिल २०२६ (रविवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, लखनौ
१२ एप्रिल २०२६ (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई