Tim David Viral Video IPL 2026: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण त्या सामन्यादरम्यान असं काही घडलं, ज्यामुळे आरसीबीचा स्टार खेळाडू टिम डेव्हिडने मैदानावर असं काही केलं, ज्यामुळे तो आता चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आरसीबीच्या १८ धावांच्या विजयात, टिम डेव्हिडने २१२ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना १६ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा केल्या. संघ पराभूत झाला, पण सामन्यादरम्यान क्रिकेटचे नियम मोडल्याबद्दल टिम डेव्हिडला शिक्षा होऊ शकते.
आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंच थांबवत असतानाही टीम डेव्हिड चेंडू घेऊन खेळताना दिसला होता.
टीम डेव्हिडने पंचांकडून चेंडू का हिसकावला?
ही संपूर्ण घटना आरसीबीच्या डावातील १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूनंतर घडली. टिम डेव्हिड चेंडूच्या आकाराबद्दल पंचांना प्रश्न विचारताना दिसला. पंचांच्या हातातून टीम डेव्हिड चेंडू घेऊन तपासताना दिसला. पंच त्याला वारंवार सांगत होते, चेंडू उडवू नकोस पण तो ऐकत नव्हता. जेव्हा पंच चेंडू मागत होते, तेव्हाही तो चेंडू देण्यास नकार देतो आणि जबरदस्तीने चेंडू उडवत तपासत राहतो. या कृत्याबद्दल पंच त्याला फटकारतात.
सामन्यादरम्यान, चेंडूची स्थिती तपासणं आणि त्यात काही समस्या असल्यास तो त्वरित बदलणं हे पंचांचे काम आहे, फलंदाजाचे नाही. क्रिकेटच्या नियमांनुसार, चेंडू बदलण्याचा निर्णय केवळ पंचच घेऊ शकतात. खेळाडूची भूमिका केवळ ही समस्या पंचांच्या निदर्शनास आणून देण्याची असते. पण तो पंचांच्या हातातून चेंडू घेऊन स्वतः तपासू शकत नाहीत किंवा पंचांवर दबाव आणू शकत नाहीत. पण टिम डेव्हिडने नेमके तेच केलं. जेव्हा पंच चेंडू तपासत होते, तेव्हा टिम डेव्हिड त्यांच्याजवळ पोहोचला आणि चेंडू त्यांच्या हातात घेऊन उडवू लागला. रोहित शर्मादेखील त्यादरम्यान टीम डेव्हिड बोलण्यासाठी पोहोचला होता.
सामन्यादरम्यान पंचांच्या कामात हस्तक्षेप करणारा कोणताही खेळाडू नियमांविरुद्ध मानला जातो. गोलंदाजी करणारा संघ पंचांकडे तक्रार करू शकतो आणि बदली चेंडूची विनंती करू शकतो, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असतो. विशेष म्हणजे, पंचांनी टिम डेव्हिडला वारंवार ताकीद दिली की तो चेंडू हाताळू शकत नाही. पण टिम डेव्हिड आपल्या भूमिकेवरून अजिबात मागे हटायला तयार नव्हता. पंचांनी त्याला सक्त ताकिद दिली. मैदानावर काय चाललं आहे याचा आवाज ऐकू येत नसला तरी, पंच त्याला स्पष्टपणे खडसावत असल्याचं दिसलं, पण डेव्हिड मात्र आपल्या मनमानी वागण्यावर ठाम होता.
