Yesterday IPL Match Result 2026: Punjab Kings vs Gujarat Titans Match Highlights & Full Scorecard (31 March 2026)- Maharaja Yadavindra Singh International Cricket Stadium in New Chandigarh: आयपीएल २०२६ मधील कालचा चौथा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला गेला. पंजाबने अखेरच्या षटकात हा सामना जिंकत विजयाने मोहिमेला सुरूवात केली आहे. २२ वर्षीय कुपर कॉनोली पंजाबच्या या विजयाचा हिरो ठरला. कुपर कॉनोलीने या सामन्यात ४४ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. एका टोकाकडून विकेट्स पडत असताना त्याने एकट्याने संघाचा डाव सावरला. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. गुजरात टायटन्स संघ पंजाबच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर २० षटकांत फक्त १६२ धावा करू शकला. तर प्रत्युत्तरात पंजाब किंग्सने १९.१ षटकांत ७ बाद १६५ धावा करत सामन्यात विजय मिळवला.
PBKS vs GT: What This Result Means for IPL
पंजाब किंग्स संघाने गुजरात टायटन्सचा घरच्या मैदानावर पराभव केला आहे. पहिला सामना जिंकल्याने पंजाब संघाचं मनोबल उंचावलं आहे. तर संघान गुणतालिकेत आणि रन रेटमध्ये आपलं खात उघडलं आहे.
काल झालेल्या PBKS vs GT सामन्यात कोण जिंकलं? Who won yesterday’s Punjab Kings vs Gujarat Titans match?
काल झालेल्या PBKS विरुद्ध GT सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) संघाने विजय मिळवला.
PBKS विरूद्ध GT सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ कोण होता? (Who was the Player of the Match in the PBKS vs GT match?)
या सामन्यात कुपर कॉनोली याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
कालच्या PBKS विरुद्ध GT सामन्याचा अंतिम स्कोअर काय होता? (What was the final score of yesterday’s match?)
या सामन्यात पंजाब किंग्स संघाचा अंतिम स्कोअर ७ बाद १६५ धावा होता. तर गुजरात टायटन्सचा संघाचा अंतिम स्कोअर ६ बाद १६२ धावा होता.
कालच्या PBKS विरूद्ध GT सामन्याचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू कोण होता? (Top Scorer of yesterday’s IPL match Punjab Kings vs Gujarat Titans?)
कालच्या सामन्याचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू पंजाब किंग्सचा कुपर कॉनोली होता. ज्याने ४४ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली.
उद्याचा IPL सामना कोणता आहे? (Tomorrow IPL Match)
उद्या IPL मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे
