IPL Auction 2025: आयपीएल २०२५ पूर्वी बीसीसीआयने अनेक नवे निर्णय घेतले आहेत. आयपीएलचा १८ वा सीझन सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलने खेळाडू कायम ठेवण्याचे धोरण जाहीर केले आहे. यावेळी काही नवीन नियमही लागू करण्यात आले आहेत, ज्यात विदेशी खेळाडूंबाबत एक नियम लागू करण्यात आला आहे, ज्याची सर्व फ्रँचायझी दीर्घकाळापासून मागणी करत होते.

गेल्या काही वर्षात आयपीएलमध्ये अनेक विदेशी खेळाडू होते जे लिलावात सहभागी झाले होते, परंतु हंगाम सुरू होण्यापूर्वी त्यांनी खेळण्यास नकार दिला, यामुळे संपूर्ण टूर्नामेंटमध्ये फ्रँचायझींना तोटा सहन करावा लागला आणि याबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलकडे संघमालकांनी तक्रारही आली होती, ज्यावर आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – IPL 2025: BCCI चा ऐतिहासिक निर्णय, IPL मध्ये खेळाडूंना मॅच फी म्हणून मिळणार ७.०५ लाख, तर सर्व सामने खेळण्यासाठी मिळणार कोट्यवधी रूपये

आयपीएल गव्हर्निंग काऊंन्सिलने सांगितले आहे की मेगा लिलावासाठी विदेशी खेळाडूने नावाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास आगामी सीझनसाठीच्या लिलावाचा तो खेळाडू भाग नसेल. यावरून हे स्पष्ट झाले आहे की आयपीएलच्या मेगा लिलावात विदेशी खेळाडूंना आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी! ‘या’ नियमामुळे महेंद्रसिंग धोनीला ठेवता येणार कायम

तर खेळाडूवर २ वर्षे बंदी घातली जाईल

बीसीसीआयच्या या नव्या नियमामुळे सर्व फ्रँचायझी आणि चाहते नक्कीच खूप खूश होतील. गेल्या काही वर्षांपासून असे अनेक खेळाडू होते ज्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच वर्कलोड मॅनेजमेंटचे कारण सांगून खेळण्यास नकार दिला होता. आता नवीन नियमानुसार, जर एखाद्या फ्रँचायझीने लिलावामध्ये खेळाडूची निवड केली आणि नंतर त्या खेळाडूने हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिला, तर अशा स्थितीत त्या खेळाडूवर आयपीएलमध्ये खेळण्यास २ वर्षांची बंदी घालण्यात येईल. याबरोबरच तो खेळाडू खेळाडू लिलावासाठी आपले नाव देऊ शकणार नाही.

आयपीएल २०२५ साठी नवे नियम

आयपीएल २०२५ ची रिटेनशन पॉलिसी जाहीर करण्यात आली आहे. मेगा लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींना त्यांच्या संघातील एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी त्यांना राईट टू मॅच, कॅप्ड प्लेयर कॅटेगरी, अनकॅप्ड प्लेअर कॅटेगरीसह भारतीय आणि विदेशी खेळाडू असे अनेक पर्याय देण्यात आले आहेत. ६ खेळाडूंना कसे कायम ठेवायचे हे फ्रँचायझीवर अवलंबून असेल. याशिवाय, इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबतही बरेच वाद झाले. मात्र हा नियम २०२७ पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – पाच खेळाडू रिटेन…मॅच फीची सुरुवात आणि दोन वर्षांची बंदी, IPL 2025 पूर्वी घेतले ‘हे’ आठ मोठे निर्णय

आयपीएल २०२५ मध्ये अनकॅप्ड खेळाडू नियम पुन्हा परत आला आहे, ज्या अंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंग धोनीला कायम ठेवू इच्छित होते. २०२१ मध्ये हा नियम रद्द करण्यात आला होता. दुसरीकडे, लिलावातील पर्स १०० कोटींवरून १२० कोटी रुपये करण्यात आली आहे. तर एकूण सॅलरी कॅप मर्यादा आता ११० कोटी रुपयांवरून १४६ कोटी रुपये झाली आहे. याशिवाय प्रथमच मॅच फी लागू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडूला (तसेच इम्पॅक्ट प्लेअर) सामना खेळण्यासाठी ७.५ लाख रुपये मिळतील.

Story img Loader