इंडियन प्रिमियर लिगच्या उर्वरित हंगामाला रविवारी मोठ्या थाटात सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या संघाने पर्वाच्या सुरुवातीचा सामना गमावाला आणि स्पर्धेतील आपल्या आठव्या सामन्यात सहावा विजय मिळवत एम एस. धोनीच्या चेन्नई सुपरकिग्सने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलं. या विजयामध्ये चेन्नईचा सलामीवीर असणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिल्यानेच चेन्नईला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. याच धावसंख्येचे जोरावर धोनीच्या संघाने सामना जिंकला. आपल्या भन्नाट फलंदाजीने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या ऋतुराज गायकवाडने भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा हुकुमी एक्का असणाऱ्या जसप्रीत बुमराहची सुद्धा धुलाई केल्याचं पहायला मिळालं. ऋतुराजने बुमराहला अगदी सहज लगावलेला षटकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की वाचा >> IPL 2021 : गुणतालिकेमध्ये धोनीचा संघच ‘सुपर किंग्स’ तर मुंबई…; पाहा CSK vs MI सामन्यानंतरचं Points Table

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

एखादा टीपिकल टी २० सामन्यात जे काही घडतं ते सारं मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यात घडलं. सुरुवातीलाच झालेली पडझड नंतर झालेल्या पार्टनरशीप आणि सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमधील भन्नाट फटकेबाजी. . मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अॅडम मिल्ने यांनी तिखट मारा करत चेन्नईची पहिल्या पॉवरप्लेमध्ये अवस्था ४ बाद २४ अशी केली. डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ऋतुराज आणि रवींद्र जडेजा यांनी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर ऋतुराजने आक्रमक फटके खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जडेजाला झेलबाद करत ही भागीदारी तोडली. गायकवाड-जडेजा यांनी ८१ धावांची भागीदारी केली, जडेजाने २६ धावा केल्या. मात्र सामनावीर ठरलेला ऋतुराज शेवटपर्यंत नाबाद राहिला.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

ऋतूराजने नाबाद ८८ धावा केल्या. आपल्या भन्नाट खेळीदरम्यान ऋतूराजने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. आपल्या ५८ चेंडूंच्या या खेळीमध्ये ऋतूराजने समोर दिसेल त्या गोलंदाजाला धुतला, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्याच्या या आक्रामक खेळीचा फटका शेवटच्या षटकांमध्ये यॉर्कर्सचा मारा करणाऱ्या बुमराहलाही बसला.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

पहिल्या डावातील शेवटचं षटक बुमराहने टाकलं. बुमराह ऋतुराजला थांबवू शकेल अशी अपेक्षा असल्याने त्याच्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र ऋतुराज काल भलत्याच चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने त्याने बुमराहलाही थेट सीमेपार टोलवलं. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न बुमराहने केला. मात्र आधीच बुमराह यॉर्कर टाकेल या अंदाजाने एक पाऊल पुढे टाकत ऋतूराजने तो यॉर्कर थेट बॅटवर घेत स्लॉग स्वीपचा फटका मारला. जो थेट मीड विकेटवरुन सीमेपार षटकार गेला अन् चेन्नईची धावसंख्या १५० वरुन १५६ वर पोहचली.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. सध्या गुणतालिकेमध्ये आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवत १.२२३ च्या रनरेटने चेन्नईचा संघ पहिल्या स्थानी आहे.