IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व फ्रँचायझी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करणार आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये संघांचे चित्र बदलले असणार आहे. आता लीगमध्ये सामील असलेल्या सर्व फ्रँचायझींनी मेगा लिलावापूर्वी फीडबॅक सत्रात अनेक बाबींवर आपले मत मांडले आहे. ज्यामध्ये तीन मोठ्या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. या ३ मागण्यांवर पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो.

हेही वाचा – Paris Olympics 2024 सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात, अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर चाहत्यांनी फेकल्या बॉटल, मेस्सीची प्रतिक्रिया व्हायरल

फ्रँचायझीने दर पाच वर्षांनी मेगा लिलाव आयोजित करणे, संघांना चार ते सहा खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी देणे यांचा समावेश आहे. सर्व फ्रँचायझींनी आठ राईट टू मॅच (RTM) कार्डचा पर्याय देण्याची मागणी केली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, आयपीएल फ्रँचायझीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएलमध्ये दर तीन वर्षांऐवजी दर पाच वर्षांनी मेगा लिलाव करण्याचे फायदे आहेत. यामुळे फ्रँचायझींना तरुण खेळाडू, विशेषतः अनकॅप्ड खेळाडू घडवण्यासाठी वेळ मिळेल. पहिल्या हंगामापासून या स्पर्धेचा भाग असलेल्या फ्रँचायझी.

नवीन तरूण खेळाडू शोधण्यासाठी फ्रँचायझी खूप मेहनत घेत असतात. क्रिकेट अकादमी तयार केल्या जातात. दर तीन वर्षांनी मेगा लिलाव होत असल्याने त्यांनी ज्या खेळाडूला ड्राफ्ट केले आहे तेच खेळाडू मेगा लिलावात त्यांच्या संघातून हिसकावले जाण्याचा धोका असतो. जर मेगा लिलाव दर पाच वर्षांनी होत असेल तर संघांना त्यांच्या खेळाडूंना दीर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवण्याची संधी मिळेल आणि ते त्यांचा मुख्य संघ तयार करू शकतील.

हेही वाचा – Olympic 2024: नीता अंबानी दुसऱ्यांदा बनल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य; निवडणुकीनंतर म्हणाल्या, “मी IOC मधील…”

गेल्या दशकात दोन वेळा आयपीएल लिलाव चार वर्षांनी झाला. २०१४ नंतर पहिल्यांदाच २०१७ मध्ये मेगा लिलाव झाला होता. कारण २०१६ आणि २०१७ अशा दोन वर्षांसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर बंदी घालण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे पुढचा मेगा लिलाव २०२१ मध्ये झाला. दोन्ही प्रसंगी, फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडूंचा करार एक वर्षासाठी वाढवण्याचा पर्याय होता.

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, राईट टू मॅच ऑप्शन या सुचवलेल्या पर्यायावर आयपीएल फ्रँचायझीच्या सीईओने सांगितले की त्यांनी संघातील एका मोठ्या खेळाडूला कायम ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे आणि याशिवाय रिलीज केलेल्या खेळाडूंना राईट टू मॅच या नियमांतर्गत संघात घेण्याची परवानगी दिली पाहिजे. जेणेकरून त्या खेळाडूंच्या किंमती निश्चित केल्या जाऊ शकतात. या नियमाचा वापर यापूर्वीही करण्यात आला आहे. त्यावेळेस संघांना पाच खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय देण्यात आला होता. यानंतर, फ्रँचायझीला मेगा लिलावात RTM द्वारे ३ खेळाडू परत मिळवता येत होते. मेगा लिलावात ज्या किमतीत त्यांनी शेवटची बोली लावली होती त्याच किंमतीला संघ खेळाडूला खरेदी करू शकतात.