भारताचे माजी सलामीवीर आणि भाजप पक्षाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गौतम गंभीर हा टी२० विश्वचषक २००७ आणि एकदिवसीय विश्वचषक २०११ जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. त्याने टीम इंडियाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा आयपीएल चषक जिंकला आहे. आता गंभीरने आयपीएलवर मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रीडा व युवक कल्याण समितीतर्फे शनिवारी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम झाला आणि यावेळी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने इंडियन प्रीमिअर लीगचे म्हणजेच आयपीएलचे गुणगान गात त्याला पाठिंबा दर्शविला. कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार असलेल्या गौतम गंभीरने दोन आयपीएल जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएलने भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलला आणि मागील अनेक वर्ष त्याचा अनेक राज्यांच्या क्रिकेट विकासालाही फायदा झाल्याचे त्याने म्हटले.

आयपीएलवर गौतम गंभीर काय म्हणाला

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर असे मानतो की, गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयपीएलची ओळख. पुढे बोलताना तो म्हणाला, ‘मला असे म्हणायचे आहे की आयपीएल ही भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा सर्व जबाबदारी आयपीएलवर येते जी योग्य नाही. जर आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर खेळाडूंना दोष द्या, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरा, परंतु आयपीएलकडे बोटे दाखवू नका.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: “माझ्या बालपणीचे स्वप्न…” रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडच्या विजयानंतर व्यक्त केल्या भावना

आयपीएलमधून खेळाडूंना हा फायदा मिळतो

आयपीएल मध्ये १५४ सामने खेळलेला गौतम गंभीर म्हणाला, “IPEL आल्याने खेळाडूंना आर्थिक सुरक्षिततेची जाणीव झाली आहे. एक खेळाडू वयाच्या ३५-३६ पर्यंत कमवू शकतो. आयपीएल त्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करते जे महत्त्वाचे आहे. जे तळागाळातील अधिक खेळाडूंच्या विकासासाठी मदत करत आहे.” पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “मी लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे की मला सर्व भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये पाहायचे आहे. कारण बिग बॅश किंवा इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला संधी मिळत नाही. भारत क्रिकेटमध्ये महासत्ता आहे, पण आमच्या प्रशिक्षकांना कुठेही संधी मिळत नाही. सर्व परदेशी येथे येतात. सर्व परदेशी येथे येतात आणि उच्च नोकर्‍या मिळवतात. आम्ही इतर लीगपेक्षा अधिक लोकशाही आणि लवचिक आहोत. आम्हाला आमच्याच लोकांना अधिक संधी देण्याची गरज आहे,”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl ipl is good on the poor performance of the players in the world cup gautam gambhir made a big statement avw
First published on: 27-11-2022 at 11:08 IST