Video : जॉर्डनचा हवेत उडी मारून टिपलेला भन्नाट झेल पाहिलात का?

बिग बॅश लीग स्पर्धेत केली कामगिरी

क्रिकेटच्या मैदानावर रोज थक्क करणाऱ्या घटना घडत असतात. कधी फलंदाज एकटा सामना फिरवतो, तर कधी गोलंदाज एकाच षटकात २-३ बळी टिपून सामन्याला कलाटणी देतात. कधी फलंदाज विचित्र फटका मारून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतो, तर कधी फिल्डर अप्रतिम झेल पकडून वाहवा मिळवतो. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेतदेखील एक भन्नाट झेल पाहायला मिळाला. पर्थ स्कोचर्स संघाच्या ख्रिस जॉर्डनने हवेत उडी घेत अफलातून झेल टिपला.

मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कोचर्स असे दोन संघ आमनेसामने होते. त्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाच्या डॅन ख्रिश्चनने लगावलेल्या फटक्यावर ख्रिस जॉर्डनने भन्नाट झेल घेतला. फवाद अहमदने गोलंदाजी करताना डॅनला चेंडू टाकला. त्या चेंडूवर डॅन ख्रिश्चनने चेंडू हवेत टोलवला. चेंडू सीमारेषेवर जाणार असं वाटत असतानाच जॉर्डनने चेंडूचा वेध घेतला. भरधाव असलेला चेंडू उडी मारून झेलण्यासाठी त्याने हवेत स्वत:ला झोकून दिले आणि भन्नाट झेल टिपला. १८ व्या षटकात हा प्रकार घडला.

महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या IPL 2020 लिलावात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ख्रिस जॉर्डनला ३ कोटींच्या बोलीसह संघात सामील करून घेतले. दरम्यान, बिग बॅश लीगमधील त्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाचा ११ धावांनी पराभव झाला. सामन्यात जॉर्डनने ३० धावा केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl kings xi punjab recruit chris jordan takes a blinder in bbl watch video vjb