बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.
आकाश सिंग अनसोल्ड
कुलदीप सेन अनसोल्ड
मुज्तबा युसुफ अनसोल्ड
समरजित सिंगसाठी चेन्नईने २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.
गुजरात टायटन्सने यश दयालसाठी ३.२० कोटींची बोली लावली.
अर्जन नागवासवाला अनसोल्ड
यश ठाकूर अनसोल्ड
वासू वत्स अनसोल्ड
अंडर १९ स्टार राजवर्धनसाठी चेन्नईने १.५० कोटी मोजले.
अष्टपैलू खेळाडू राज बावासाठी हैदराबाद आणि मुंबईमध्ये लढत पाहायला मिळाली. त्यानंतर पंजाबने बावासाठी २ कोटी दिले आणि संघात सामील केले.
मुंबई इंडियन्सने संजयसाठी ५० लाखांची बोली लावली.
विकी ओसवाल अनसोल्ड
गुजरात टायटन्सने दर्शनसाठी २० लाख मोजत संघात सामील केले.
केकेआरने अनुकूलसाठी २० लाख मोजले.
आरसीबीने महिपालसाठी ९५ लाख मोजले.
विश्वविजेत्या अंडर १९ संघाचा कप्तान यश धुलसाठी दिल्लीने सुरुवातीला बोली लावली. दिल्लीने त्याला ५० लाखात संघात घेतले.
दिल्लीनेच रिपल पटेलला २० लाखात संघात घेतले.
अष्टपैलू खेळाडू ललित यादवसाठी दिल्ली, हैदराबादने सुरुवातीला बोली लावली. दिल्लीने ६५ लाखांत ललितला संघात घेतले.
लखनऊने मननसाठी २० लाख मोजले.
रिकी भूई अनसोल्ड
लखनऊ आणि केकेआरने रिंकूसाठी बोली लावली. केकेआरने रिंकूसाठी ५५ लाख मोजले.
हिमांशू राणा अनसोल्ड
हरनूर सिंग अनसोल्ड
सचिन बेबी अनसोल्ड
हिंमत सिंग अनसोल्ड
चेन्नईने महीषला ७० लाखात संघात सामील केले.
विराट सिंग अनसोल्ड
पीयुष चावला अनसोल्ड
इश सोधी अनसोल्ड
