बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.

Live Updates
14:12 (IST) 13 Feb 2022
कर्ण शर्मा अनसोल्ड

कर्ण शर्मा अनसोल्ड

14:05 (IST) 13 Feb 2022
शाहबाज नदीमसाठी बोली

लखनऊने नदीमसाठी ५० लाख मोजले.

14:04 (IST) 13 Feb 2022
कैस अहमद अनसोल्ड

कैस अहमद अनसोल्ड

14:03 (IST) 13 Feb 2022
तबरेझ शम्सी अनसोल्ड

तबरेझ शम्सी अनसोल्ड

14:03 (IST) 13 Feb 2022
मयांक मार्कंडेसाठी बोली

फिरकीपटू मयांक मार्कंडेसाठी मुंबई आणि राजस्थानने बोली लावली. मुंबईने त्याला ६५ लाखांमध्ये संघात सामील केले.

13:58 (IST) 13 Feb 2022
नाथन कुल्टर नाइल अनसोल्ड

नाथन कुल्टर नाइल अनसोल्ड

13:57 (IST) 13 Feb 2022
जयदेव उनाडकटसाठी बोली

जयदेव उनाडकटसाठी मुंबई आणि चेन्नईने पहिली बोली लावली. मुंबईने जयदेवला १.३० कोटींमध्ये संघात घेतले.

13:55 (IST) 13 Feb 2022
शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड

शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड

13:54 (IST) 13 Feb 2022
नवदीप सैनीसाठी बोली

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीसाठी मुंबई आणि लखनऊने सुरुवातीला बोली लावली. त्यानंतर राजस्थानने त्याला २.६० कोटीत संघात घेतले.

13:48 (IST) 13 Feb 2022
संदीप शर्मासाठी बोली

स्विंग गोलंदाजी करण्यात तरबेज असलेल्या संदीप शर्मासाठी पंजाबने ५५ लाख मोजले.

13:46 (IST) 13 Feb 2022
चेतन साकारियासाठी बोली

दिल्ली कॅपिटल्सने चेतनसाठी ४.२० कोटी मोजले.

13:37 (IST) 13 Feb 2022
लुंगी एनगिडी अनसोल्ड

लुंगी एनगिडी अनसोल्ड

13:37 (IST) 13 Feb 2022
दुश्मंथा चमीरासाठी बोली

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चमीराला लखनऊने २ कोटींमध्ये संघात घेतले.

13:33 (IST) 13 Feb 2022
खलील अहमदसाठी बोली

डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदसाठी दिल्लीने मोठी बोली लावली. त्यांनी ५.२५ कोटी मोजले.

13:26 (IST) 13 Feb 2022
इशांत शर्मा अनसोल्ड

इशांत शर्मा अनसोल्ड

13:13 (IST) 13 Feb 2022
कृष्णप्पा गौतमासाठी बोली

लखनऊने गौतमसाठी पहिली बोली लावली. ९० लाखांत गौतम लखनऊ संघात सामील झाला.

13:10 (IST) 13 Feb 2022
शिवम दुबेसाठी बोली

अष्टपैलू खेळाडू दुबेसाठी चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी मोजले.

13:00 (IST) 13 Feb 2022
मार्को जानसेनसाठी बोली

आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जानसेनसाठी मुंबई, राजस्थान आणि हैदराबादने बोली लावली. हैदराबादने ४.२० कोटींमध्ये जानसेनला संघात घेतले.

12:56 (IST) 13 Feb 2022
ओडियन स्मिथसाठी बोली

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू स्मिथसाठी पंजाब, हैदराबाद आणि राजस्थानने बोली लावली. पंजाबने त्याला ६ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले.

12:44 (IST) 13 Feb 2022
ख्रिस जॉर्डन अनसोल्ड

ख्रिस जॉर्डन अनसोल्ड

12:43 (IST) 13 Feb 2022
विजय शंकरसाठी बोली

गुजरातने विजयसाठी १.४० कोटींची बोली लावत त्याला संघात दाखल केले.

12:39 (IST) 13 Feb 2022
जयंत यादवसाठी बोली

फिरकीपटू जयंत यादवसाठी गुजरात आणि लखनऊने बोली लावली. गुजरातने त्याला १.७० कोटींमध्ये संघात घेतले.

12:38 (IST) 13 Feb 2022
जेम्स नीशम अनसोल्ड

जेम्स नीशम अनसोल्ड

12:37 (IST) 13 Feb 2022
डॉमिनिक ड्रेक्ससाठी बोली

गुजरातने ड्रेक्ससाठी १.१० कोटी मोजले.

12:34 (IST) 13 Feb 2022
लियाम लिव्हिंगस्टोनसाठी बोली

लिव्हिंगस्टोनसाठी चेन्नई, पंजाब आणि कोलकाताने बोली लावली. पंजाबने त्याला ११.५० कोटींमध्ये संघात घेतले.

12:20 (IST) 13 Feb 2022
चेतेश्वर पुजारा अनसोल्ड

चेतेश्वर पुजारा अनसोल्ड

12:20 (IST) 13 Feb 2022
आरोन फिंच अनसोल्ड

आरोन फिंच अनसोल्ड

12:19 (IST) 13 Feb 2022
सौरभ तिवारी अनसोल्ड

सौरभ तिवारी अनसोल्ड

12:18 (IST) 13 Feb 2022
इऑन मॉर्गन अनसोल्ड

इऑन मॉर्गन अनसोल्ड

12:18 (IST) 13 Feb 2022
मार्नस लाबुशेन अनसोल्ड

ऑस्ट्रेलियाचा गुणी फलंदाज मार्नससाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही.