बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.

Live Updates
12:16 (IST) 13 Feb 2022
मनदीप सिंगसाठी बोली

लखनऊने मनदीपसाठी पहिली बोली लावली. त्याला १.१० कोटीमध्ये दिल्लीने संघात दाखल केले.

12:14 (IST) 13 Feb 2022
डेव्हिड मलानसाठी बोली

इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानसाठी कोणीही बोली लावली नाही.

12:13 (IST) 13 Feb 2022
अजिंक्य रहाणेसाठी बोली

मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी केकेआरने पहिली बोली लावली. केकेआरने त्याच्यासाठी १ कोटी मोजत संघात घेतले.

12:12 (IST) 13 Feb 2022
एडन मार्करामसाठी बोली

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामसाठी बोली लावण्यात आली. हैदराबादने त्याला २.६० कोटीला संघात घेतले.

12:05 (IST) 13 Feb 2022
ऑक्शनला सुरुवात

चारु शर्मा आजही ऑक्शनरची भूमिका बजावत आहेत.

11:36 (IST) 13 Feb 2022
कोणाकडे किती रक्कम शिल्लक?
  • चेन्नई सुपर किंग्ज – २०.४५ कोटी.
  • दिल्ली कॅपिटल्स – १६.५० कोटी.
  • गुजरात टायटन्स – १८.८५ कोटी.
  • कोलकाता नाइट रायडर्स – १२.६५ कोटी.
  • लखनऊ सुपर जायंट्स – ६.९० कोटी.
  • मुंबई इंडियन्स – २७.८५ कोटी.
  • पंजाब किंग्ज – २८.६५ कोटी.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – ९.२५ कोटी.
  • सनरायझर्स हैदराबाद – २०.१५ कोटी.
  • 11:36 (IST) 13 Feb 2022
    लिलावाच्या पहिल्या दिवशी महागडे ठरलेले खेळाडू
  • ईशान किशन – १५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)
  • दीपक चहर – १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
  • श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
  • शार्दुल ठाकूर – १०.७५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
  • वनिंदू हसरंगा – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • निकोलस पूरन – १०.७५ कोटी (सनरायझर्स हैदराबाद
  • हर्षल पटेल – १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • 11:34 (IST) 13 Feb 2022
    पहिल्या दिवशी इशान किशनची बाजी

    इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महालिलावात शनिवारी २० कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. १५ कोटी, २५ लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले.

    11:34 (IST) 13 Feb 2022
    पुजारा, साहा, रहाणे, इशांतचे भवितव्य आज

    अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी कसोटी क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशी लिलावात स्थान मिळाले नाही. परंतु रविवारी संघांनी उत्सुकता दर्शवली तरच या खेळाडूंचे भवितव्य ठरू शकेल. याशिवाय सुरेश रैना, डेव्हिड मिलर, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मॅथ्यू वेड, सॅम बिलिंग्स यांच्यावरही शनिवारी बोली लागली नाही.