जगातील श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस पार पडला. पहिल्या दिवशी ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांच्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंटा वरचष्मा पाहायला मिळाला. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.

पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर बोली लागली. ७४ खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर २३ खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. ईशान किशनला (१५.२५) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
couple destination wedding in Spiti Valley
हाडे गोठवणाऱ्या थंडीत जोडप्याने केलं लग्न! स्पिती व्हॅलीतील Destination Wedding व्हिडीओ बघाच
Live Updates
21:52 (IST) 12 Feb 2022
लिलावाच्या पहिल्या दिवशी महागडे ठरलेले खेळाडू
  • ईशान किशन - १५.२५ कोटी (मुंबई इंडियन्स)
  • दीपक चहर - १४ कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
  • श्रेयस अय्यर - १२.२५ कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
  • शार्दुल ठाकूर - १०.७५ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
  • वनिंदू हसरंगा - १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • निकोलस पूरन - १०.७५ कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
  • हर्षल पटेल - १०.७५ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
  • 21:48 (IST) 12 Feb 2022
    कोणाकडे किती रक्कम शिल्लक?
  • चेन्नई सुपर किंग्ज - २०.४५ कोटी.
  • दिल्ली कॅपिटल्स - १६.५० कोटी.
  • गुजरात टायटन्स - १८.८५ कोटी.
  • कोलकाता नाइट रायडर्स - १२.६५ कोटी.
  • लखनऊ सुपर जायंट्स - ६.९० कोटी.
  • मुंबई इंडियन्स - २७.८५ कोटी.
  • पंजाब किंग्ज - २८.६५ कोटी.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९.२५ कोटी.
  • सनरायझर्स हैदराबाद - २०.१५ कोटी.
  • 21:38 (IST) 12 Feb 2022
    संदीप लामिछाने अनसोल्ड

    संदीप लामिछाने अनसोल्ड

    21:34 (IST) 12 Feb 2022
    आर साईकिशोरसाठी बोली

    आर साईकिशोरसाठी गुजरातने बोली लावली. त्यांनी ३ कोटी देत साईकिशोरला संघात घेतले.

    21:27 (IST) 12 Feb 2022
    जगदीश सुचितसाठी बोली

    हैदराबादने जगदीश सुचितसाठी बोली लावली. त्यांनी २० लाखांत सुचितला संघात घेतले.

    21:26 (IST) 12 Feb 2022
    श्रेयस गोपालसाठी बोली

    फिरकीपटू श्रेयस गोपालसाठी हैदराबादने ७५ लाखांची बोली लावली आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.

    21:23 (IST) 12 Feb 2022
    केसी. करियप्पासाठी बोली

    केसी. करियप्पासाठी मुंबई, राजस्थान आणि केकेआरने बोली लावली. करियप्पासाठी राजस्थानने ३० लाख मोजले.

    21:21 (IST) 12 Feb 2022
    एम. सिद्धार्थ अनसोल्ड

    एम. सिद्धार्थ अनसोल्ड

    21:21 (IST) 12 Feb 2022
    फिरकीपटू मुरगन अश्विनसाठी बोली

    मुरगन अश्विनसाठी मुंबई आणि हैदराबादने बोली लावली. मुंबईने त्याला १.६० कोटींमध्ये संघात दाखल केले.

    21:17 (IST) 12 Feb 2022
    नूर अहमदसाठी बोली

    गुजरातने ३० लाखात फिरकीपटू नूर अहमदला संघात घेतले.

    21:15 (IST) 12 Feb 2022
    अंकितसिंग राजपूतसाठी बोली

    लखनऊने ५० लाखांत अंकितसिंग राजपूतला संघात घेतले.

    21:13 (IST) 12 Feb 2022
    तुषार देशपांडेसाठी बोली

    चेन्नईने तुषारला २० लाखात संघात दाखल केले.

    21:12 (IST) 12 Feb 2022
    इशान पोरेलसाठी बोली

    पंजाबने २५ लाखांत इशान पोरेलला संघात दाखल करून घेतले.

    21:10 (IST) 12 Feb 2022
    आवेश खानसाठी बोली

    जलदगती गोलंदाज आवेश खानसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. लखनऊने त्याच्यासाठी १० कोटी मोजले.

    21:04 (IST) 12 Feb 2022
    केएम आसिफसाठी बोली

    वेगवान गोलंदाज आसिफसाठी चेन्नईने २० लाखांची बोली लावली.

    21:03 (IST) 12 Feb 2022
    आकाश दीपसाठी बोली

    बंगळुरूने आकाश दीपसाठी २० लाखाची बोली लावत त्याला संघात दाखल केले.

    21:02 (IST) 12 Feb 2022
    कार्तिक त्यागी

    हैदराबादने कार्तिकला आपल्या ताफ्यात सामील केले. कार्तिकला ४ कोटींची बोली लागली.

    20:56 (IST) 12 Feb 2022
    बेसिल थम्पीसाठी बोली

    वेगवान गोलंदाज बेसिल थम्पीसाठी मुंबईने बोली लावली. त्यांनी ३० लाखांत थम्पीला संघात घेतले.

    20:54 (IST) 12 Feb 2022
    जितेश शर्मासाठी बोली

    पंजाब किंग्जने जितेशला २० लाखात संघात घेतले.

    20:53 (IST) 12 Feb 2022
    शेल्डन जॅक्सन केकेआरमध्ये

    केकेआरने शेल्डन जॅक्सनला ६० लाखात संघात घेतले.

    20:51 (IST) 12 Feb 2022
    प्रभसिमरन सिंगसाठी बोली

    पंजाब किंग्ज आणि लखनऊने प्रभसिमरन सिंगसाठी बोली लावली. पंजाबने त्यासला ६० लाखात संघात घेतले.

    20:51 (IST) 12 Feb 2022
    एन जगदीशन अनसोल्ड

    एन जगदीशन अनसोल्ड

    20:47 (IST) 12 Feb 2022
    अनुज रावतसाठी बोली

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनुजसाठी ३.४० कोटी मोजले.

    20:42 (IST) 12 Feb 2022
    विष्णू सोलंकी अनसोल्ड

    विष्णू सोलंकी अनसोल्ड

    20:41 (IST) 12 Feb 2022
    विष्णू विनोद अनसोल्ड

    विष्णू विनोद अनसोल्ड

    20:41 (IST) 12 Feb 2022
    मोहम्मद अझरुद्दीनसाठी अनसोल्ड

    मोहम्मद अझरुद्दीनसाठी अनसोल्ड

    20:40 (IST) 12 Feb 2022
    केएस भरतसाठी बोली

    यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी दिल्लीने २ कोटी मोजले.

    20:23 (IST) 12 Feb 2022
    शाहबाज अहमदसाठी बोली

    शाहबाज अहमदसाठी हैदराबाद आणि बंगळुरूने बोली लावली. बंगळुरूने २.४० कोटींमध्ये त्याला संघात घेतले.

    20:18 (IST) 12 Feb 2022
    हरप्रीत ब्रारसाठी बोली

    पंजाब, बंगळुरूने हरप्रीतसाठी बोली लावली. पंजाबने हरप्रीत ब्रारला ३.८० कोटीमध्ये संघात दाखल केले.

    20:12 (IST) 12 Feb 2022
    कमलेश नागरकोटीसाठी बोली

    कमलेश नारकोटीसाठी दिल्ली आणि कोलकाताने बोली लावली. दिल्लीने त्याला १.१० कोटींमध्ये संघात दाखल केले.

    20:09 (IST) 12 Feb 2022
    राहुल तेवतियासाठी बोली

    अष्टपैलू खेळाडू तेवतियासाठी गुजरात टायटन्सने ९ कोटी मोजले.

    19:59 (IST) 12 Feb 2022
    शिवम मावीसाठी बोली

    वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी केकेआरने ७.२५ कोटींची बोली लावली.

    19:54 (IST) 12 Feb 2022
    सरफराज खानसाठी बोली

    सरफराज खानला २० लाखांची बोली लावत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात दाखल केले.

    19:51 (IST) 12 Feb 2022
    शाहरुख खानसाठी बोली

    धाकड फलंदाज शाहरुख खानसाठी चेन्नई, पंजाबने बोली लावली. ९ कोटींमध्ये शाहरुख पंजाबसाठी खेळेल.

    19:42 (IST) 12 Feb 2022
    अभिषेक शर्मासाठी बोली

    पंजाब, गुजरात आणि हैदराबादने अभिषेकसाठी बोली लावली. हैदराबादने ६.५० कोटींची बोली लावत अभिषेकला संघात घेतले.

    19:32 (IST) 12 Feb 2022
    रियान परागसाठी बोली

    राजस्थानने रियानसाठी ३.८० कोटी मोजले.

    19:23 (IST) 12 Feb 2022
    सी. हरि निशांत अनसोल्ड

    सी. हरि निशांत अनसोल्ड

    19:23 (IST) 12 Feb 2022
    राहुल त्रिपाठीसाठी बोली

    फलंदाज राहुल त्रिपाठीसाठी जवळपास सर्वच फ्रेंचायझींनी बोली लावली. हैदराबादने त्याला ८.५० कोटींमध्ये संघात दाखल केले.

    19:18 (IST) 12 Feb 2022
    अनमोलप्रित सिंग अनसोल्ड

    अनमोलप्रित सिंग अनसोल्ड

    19:17 (IST) 12 Feb 2022
    अश्विन हेब्बारसाठी बोली

    अश्विन हेब्बारसाठी दिल्ली कॅपिटल्सने २० लाख मोजले.

    19:16 (IST) 12 Feb 2022
    बेबी एबीसाठी बोली

    बेबी एबी म्हणून प्रसिद्ध झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईने बोली लावली. नुकत्याच झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ब्रेविसने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मुंबईने ब्रेविसला ३ कोटींमध्ये संघात दाखल केले.

    19:11 (IST) 12 Feb 2022
    अभिनव सदारंगनीसाठी बोली

    कर्नाटकचा फलंदाज अभिनव सदारंगनीसाठी गुजरात संघाने २.६० कोटी मोजले.

    19:08 (IST) 12 Feb 2022
    प्रियम गर्गसाठी बोली

    प्रियम गर्गसाठी हैदराबादने २० लाखांची बोली लावत त्याला संघात घेतले.

    19:07 (IST) 12 Feb 2022
    रजत पाटीदार अनसोल्ड

    रजत पाटीदार अनसोल्ड

    18:39 (IST) 12 Feb 2022
    अमित मिश्रा अनसोल्ड

    फिरकीपटू अमित मिश्रा अनसोल्ड राहिला.

    18:38 (IST) 12 Feb 2022
    यजुर्वेंद्र चहलसाठी बोली

    भारताचा स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलसाठी मोठी बोली लागली. राजस्थानने चहलला ६.५० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.

    18:32 (IST) 12 Feb 2022
    राहुल चहरसाठी बोली

    मुंबईसाठी खेळलेल्या राहुलसाठी मुंबई, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीने बोली लावली. पंजाबने राहुलला ५.२५ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले.

    18:22 (IST) 12 Feb 2022
    अॅडम झम्पा अनसोल्ड

    ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

    18:21 (IST) 12 Feb 2022
    कुलदीप यादव दिल्लीत

    भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसाठी पंजाब आणि दिल्लीने बोली लावली. दिल्लीने कुलदीपला २ कोटींमध्ये संघात घेतले.

    18:18 (IST) 12 Feb 2022
    अनुभवी इम्रान ताहीर अनसोल्ड

    दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर अनसोल्ड राहिला.