क्रिकेट विश्वात सर्वात श्रीमंत लीग म्हणून इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलकडे पाहिलं जातं. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली. येत्या वर्षात आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश झाला असून संघ संख्या ८ वरून १० झाली आहे. आरपीएसजीने लखनऊ, तर सीव्हीसी कॅपिटल्सने सर्वाधिक बोली लावत अहमदाबाद संघ आपल्या नावावर केला आहे. लखनऊचा संघ उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालिकीच्या आरपीएसजी समूहाने ७,०९० कोटींची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली ठरली.CVC कॅपिटलने ५,६०० कोटी रुपयांची बोली लावली. त्यामुळे आरपीएसजी समुहाचे मालक संजीव गोयंका आहेत तरी कोण?, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

कोण आहेत संजीव गोयंका?

newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत
Rohit Sharma May Leave Mumbai Indians Indians After IPL 2024-Reports
Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वावर नाराज असलेला रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?

संजीव गोयंका यांचं नाव प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीत आहे. त्यांचा समूह प्रामुख्याने ६ मोठ्या उद्योगात कार्यरत आहेत. ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने, मीडिया आणि मनोरंजन, शिक्षण आणि आयटी, सारेगामा इंडिया आणि फिलिप्स कार्बन ब्लॅक हे सहा उद्योग आहेत. गोयंका यांच्या समुहात ५० हजाराहून अधिक लोक काम करत आहेत. तसेच त्यांची ४.३ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. तसेच त्यांच्या समुहाचे लाखो शेअरहोल्डर्स आहेत. २००१ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. सर्वात तरूण वयात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यांनी आयआयटी खरगपूरमध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. याशिवाय पंतप्रधान व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्यही राहिले आहेत.

आरपीएसजी समुहाकडे यापूर्वी पुणे संघाची मालिकी होती. तसेच या संघात महेंद्रसिंह धोनी कर्णधार आणि स्टीव्ह स्मिथसारखा खेळाडू खेळला आहे. २०१७ च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत संघ पोहोचला होता. मात्र त्यानंतरच्या आयपीएलमध्ये संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. आता लखनऊ संघासह गोयंका समुहाने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आगमन केलं आहे.