आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात ठपका ठेवण्यात आलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) पाच वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखालील समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. या समितीमध्ये ज्योतिरादित्य सिंधींया आणि निरंजन शाह यांचा समावेश आहे.

असद रौफ यांचा आयसीसीच्या एलिट पॅलनचे सदस्य आहेत. २०१३ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत सामना निश्चितीच्या बदल्यात बुकींकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याप्रकरणाचा आरोप ठेवण्यात आला होता. असद रौफ यांना आपली बाजू मांडण्यासाठी ९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. रौफ यांच्याकडून ८ फेब्रवारीला कागदपत्रे आणि लेखी स्वरुपात बाजू बीसीसीआयच्या समितीसमोर सादर करण्यात आली. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत शिस्तपालन समितीने रौफ यांना दोषी ठरवून त्यांच्यावर पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेतला.

Story img Loader