IPL वर पुन्हा करोनाचं संकट?; हैदराबादच्या टी नटराजनला लागण; संपर्कातील सहा जण विलगीकरणात

सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण झाली आहे

IPlL, Covid 19, Corona, Coronavirus,
टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

आयपीएलवर पुन्हा एकदा करोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनला करोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर चाचणी केली असता टी नटराजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आयपीएलने दिली आहे. टी नटराजनला करोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसून सध्या इतर सहकाऱ्यांपासून अंतर ठेवत विलगीकरणात आहे. सनरायजर्स हैदराबादचा आज दिल्ली कॅपिटल्ससोबत सामना होणार आहे. करोनामुळे आयपीएल स्थगित केल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत खेळलं जात असून हैदराबादचा हा पहिलाचा सामना आहे.

दरम्यान टी नटराजनसोबत हैदराबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. हे सर्वजण टी-नटराजनच्या संपर्कात आले होते अशी माहिती देण्यात आली आहे.

आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता जवळच्या संपर्कातील आणि इतरांची आरटीपीसीआर टेस्ट केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणारा सामना ठरल्याप्रमाणे पार पडेल”.

टी-नटराजनच्या संपर्कात आलेले ते सहाजण ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे त्यामध्ये विजय शंकर, टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर. नेट गोलंदाज पेरियासॅमी गणेशन यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl sunrisers hyderabad t natarajan tests positive for covid sgy