प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. या खास दिवशी आयपीएलमधील बलाढ्य संघ मुंबई इंडियन्सने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएलची सर्वाधिक पाच विजेतेपदे जिकली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सने ट्विटरवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी मराठीतून ट्वीट केले आहे. आपली वन फॅमिली म्हणत मुंबईने मराठीत खेळा़डूंची नावे असलेले एक पोस्टर शेअर केले आहे. यात रोहितच्या जर्सीवरील ४५ हा आकडा आणि रोहितचे नावही मराठीत आहे.”आपली टीम, आपली भाषा! पलटन, मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे त्यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले.

हेही वाचा – IND vs SL : आयसीयूत दाखल केलेल्या इशान किशनविषयी महत्त्वाचं अपडेट; डोक्याला बसला होता मार!

मराठी साहित्याची महानता ओळखण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मराठी भाषेत आधुनिक इंडो-आर्यन भाषांमधील काही प्राचीन साहित्याचा समावेश आहे. १९९९ मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही सुरू करण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl team mumbai indians wishes marathi bhasha din adn
First published on: 27-02-2022 at 15:02 IST