आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, ज्यामध्ये केवळ खेळाडूंनाच करोडो रुपये मिळत नाहीत तर जगभरातील स्टार खेळाडूंना जवळून खेळताना पाहण्याची संधी युवा खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही मिळते. मात्र, पाकिस्तानचे खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत याचे कारण म्हणजे दोन्ही देशांतील तणावाचे संबध आहेत.

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा विश्वास आहे की पाकिस्तान सुपर लीग ही इंडियन प्रीमियर लीग पेक्षा चांगली टी२० लीग आहे. मुलतान सुल्तान्सच्या कर्णधाराने दोन्ही टी२० लीगची तुलना केली आणि पीएसएलमधील क्रिकेटचा दर्जा अधिक मजबूत असल्याचे सांगितले. रिझवान म्हणाला की, “पीएसएलमधील सर्वोच्च कामगिरी करणारा पाकिस्तानी संघाचा राखीव खेळाडू आहे. रिझवान म्हणाला की, पीएसएलमध्ये सहभागी होणारे परदेशी खेळाडूही ही सर्वात कठीण लीग असल्याचे मान्य करतात.”

Dipendra Singh Airee Sixes Video
Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

राखीव खेळाडूही बाकावर बसलेले दिसतात

आयपीएलच्या धर्तीवर जगभरात अनेक क्रिकेट लीग खेळल्या जात आहेत, पाकिस्तान सुपर लीग त्यापैकी एक आहे. पीएसएल ड्राफ्ट अंतर्गत खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आयपीएल आणि पीएसएलची तुलना करताना खळबळजनक विधान केले आहे. रिझवान म्हणतो की, “पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पेक्षा मोठी आहे.” तो म्हणाले की, “पाकिस्तानच्या टी२० लीगमध्ये राखीव खेळाडूही बाकावर बसलेले दिसतात.”

हेही वाचा:   विश्लेषण: अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! यापूर्वी कोणत्या पिता-पुत्रांनी गाजवलेले क्रिकेटचे मैदान?

पीएसएलने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून सोडले

पुढे बोलताना रिझवान म्हणाला की, “आम्ही म्हणत होतो की आयपीएल आहे, आता इथे खेळून परत जाणार्‍या खेळाडूंना विचाराल तर ते म्हणतात की ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडूदेखील बाकावर बसलेला असतो कारण इथे तुमच्या कामगिरीच्या जोरावर संघात स्थान देण्यात येते म्हणून पीएसएलला जगातील सर्वात कठीण लीग म्हटले जाते.” रिझवान पुढे म्हणाला, “साहजिकच सर्वांना माहित आहे की पीएसएलने संपूर्ण जगाला चकित केले आहे. त्यात यश येणार नाही, असे सुरुवातीला सांगण्यात आले पण एक खेळाडू म्हणून आम्हालाही वाटते की आम्ही जगभरात नाव कमावले आहे.”

पाकिस्तान सुपर लीग २०२३ साठीचा लिलाव संपला आहे. पाकिस्तान आणि बाहेरील एकूण ५०० क्रिकेटपटू या लिलावाचा भाग होते. आदिल रशीद मुलतान सुलतान या संघाकडून खेळणार असून जिमी नीशम पेशावर झल्मीकडून खेळेल. इस्लामाबाद युनायटेडने मोईन अली आणि अबरार अहमद यांचा संघात समावेश केला आहे.

हेही वाचा:   Ranji Trophy 2022: रणजीतील शतकानंतर दिनेश कार्तिक अर्जुन तेंडुलकरचा झाला चाहता, कौतुक करताना केले मोठे विधान

विशेष म्हणजे पीएसएलच्या तुलनेत आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश आहे. पीएसएल ही फक्त सहा संघांवर आधारित लीग आहे. याच्यात अव्वल खेळाडूंना आयपीएल खेळाडूच्या मूळ किमतीएवढे पैसे मिळतात. दरम्यान, पेशावर झल्मीने आपला कर्णधार बदलला आहे. बाबरला वहाब रियाझच्या जागी पेशावर झल्मीचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.