scorecardresearch

MS Dhoni: पुन्हा एकदा एमएस धोनीने जिंकली चाहत्यांची मनं! बॅट सोडत उचलला पेटिंग ब्रश, पाहा VIDEO

MS Dhoni painting chairs: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चेपॉक स्टेडियमध्ये खुर्च्यांना रंग देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे

MS Dhoni painting chairs at Chepauk Stadium
एमएस धोनी ( फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MS Dhoni painting chairs at Chepauk Stadium: इंडियन प्रीमियर लीग २०२३ (IPL 2023) च्या आधी नेटमध्ये फलंदाजी करण्यापासून सराव सत्रापर्यंत, चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रचंड घाम गाळत आहे. ४२ वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या तयारीत कोणतीही कसर सोडलेली नाही. दरम्यान, कॅप्टन कूलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियम हे सीएसकेच्या घरच्या मैदानावर तो जर्सीच्या रंगात खुर्ची रंगवताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीचा रंग सुरुवातीपासूनच पिवळा आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, धोनी स्टँडमधील खुर्चीवर पेंट स्प्रे वापरताना दिसत आहे. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी स्टँडच्या देखभालीचे काम सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुम्ही धोनीला स्प्रेसोबत पाहू शकता. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या गुजरात जायंट्सविरुद्ध आपली मोहीम सुरु करेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना –

आयपीएल २०२३ मधील सीएसकेचा आणि या हंगामाचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला जाणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते. या दोनही सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील हंगाम चेन्नईसाठी चांगला नव्हता. चार वेळचा चॅम्पियन संघ गुणतालिकेत ९व्या क्रमांकावर होता.

दीपक चहरने सर्व अंदाज खोडून काढले –

महेंद्रसिंग धोनी या वर्षीच्या आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर अफवा आहे की हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. परंतु या बातमीची पुष्टी करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही. आयपीएल २०२३ च्या आधी, वेगवान गोलंदाज दीपक चहरने सर्व अंदाज खोडून काढले आहे. तो म्हणाला धोनी अजून फिट आहे, त्यामुळे तो अजून किती हंगामा खेळेल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षीच्या मिनी लिलावात CSK ने १६.२५ कोटींना करारबद्ध केलेल्या बेन स्टोक्सवरही सर्वांचे लक्ष असेल.

आयपीएल २०२३ साठी सीएसके संघ:

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, सिमरजित सिंह, दीपिका, दीपिका, सिमार, , प्रशांत सोळंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू, काइल जेमिसन, अजय मंडल, भगत वर्मा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 14:04 IST

संबंधित बातम्या