Surya And Tilak Funny Video Viral: आयपीएल २०२३ मधील एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स संघात खेळला गेला. हा सामना जिंकत मुंबईने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात धडक मारली. या सामन्यात मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपरजायंट्सचा संघ १०१ धावांवर गारद झाला. या पराभवानंतर लखनऊचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरातचा सामना करणार आहे. याआधी मुंबई इंडियन्सने इंस्टावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सने गुजरातविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिलक वर्माचा विमान प्रवासात शूट केलेला आहे. या व्हिडीओमध्ये तिलक वर्माचा खिडकीच्याकडेला झोपलेला दिसत आहे. त्यावेळी मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव एका हवाई सुंदरीकडून लिंबू घेतो. त्यानंतर झोपलेला तिलकडे जातो. त्यावेळी तिलक वर्मा तोंड उघडे ठेवून झोपलेला दिसताच, त्याच्या तोंडात लिंबू पिळतो. यानंतर तिलक वर्मा खडबडून जागा होतो आणि इकडे-तिकडे पाहतो. त्यावेळी इतर सर्व हसू लागतात. या घटनेचा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन दिले आहे. ज्यामधये लिहले,’ चैन से सोना है, तो जाग जाऊ.’

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

मुंबईने लखनTचा ८१ धावांनी पराभव केला –

मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा ८१ धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी मुंबईचा सामना गुजरातशी होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६.३ षटकांत अवघ्या १०१ धावांवर गारद झाला.

हेही वाचा – LSG vs MI: मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचे खेळाडू एकमेकांना धडकल्याचा VIDEO व्हायरल; चाहते म्हणाले, ‘गंभीर…’

या सामन्यात मुंबईसाठी सर्व खेळाडूंनी फलंदाजी करत योगदान दिले. ग्रीनने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याचवेळी लखनऊकडून नवीन-उल-हकने चार आणि यश ठाकूरने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसने दुसऱ्या डावात लखनऊसाठी सर्वाधिक ४० धावा केल्या. मुंबईच्या आकाश मधवालने पाच बळी घेतले.