IPL 2023 Final CSK vs GT Match Updates: आयपीएल २०२३ मधील अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले की, एमएस धोनीसाठी हा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकावा अशी माझी इच्छा आहे. गावसकरांच्या मते, गुजरात टायटन्स हा एक मजबूत संघ आहे, पण धोनीमुळे ते सीएसकेला आयपीएल ट्रॉफी जिंकताना पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.

Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Mathc Highlights in marathi
KKR vs LSG : कोलकाताचा ऐतिहासिक विजय! लखनऊचा ८ विकेट्सनी उडवला धुव्वा
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्जने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तसेच आता त्यांचे पाचव्यांदा जेतेपदावर लक्ष असेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांना सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवायचे आहे. सीएसके आणि जीटी हे दोन्ही संघ या हंगामातील सर्वोत्तम संघ आहेत. दोघेही फायनलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे सामना रोमांचक होईल अशी, अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final CSK vs GT: फायनल सामन्यात ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांच्या नजरा, जाणून घ्या कोण आहेत?

एमएस धोनीला पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचे पाहताना आनंद होईल –

सुनील गावसकर यांच्या म्हणण्यानुसार, एमएस धोनीने हे विजेतेपद जिंकावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. स्पोर्ट्स टुडेवरील संवादादरम्यान ते म्हणाले, “चेन्नई सुपर किंग्ज हा नेहमीच माझा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा आवडता संघ राहिला आहे. सीएसकेने जिंकावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण एमएस धोनीने अजून एक जेतेपद जिंकले, तर ते खूप चांगले होईल. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोणताही निर्णय शांत राहून घेतल्याने खूप फरक पडतो. गुजरात टायटन्स हा संघ खूप चांगला आहे. त्यांच्याकडे शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यासारखे उत्कृष्ट सलामीवीर आहेत, पण सीएसकेने हा सामना जिंकावा अशी माझी इच्छा आहे.”