scorecardresearch

Premium

IPL 2023 Final Match: आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडूचे धोनीबद्दल मोठे विधान, म्हणाला, “म्हातारा झाल्यावरही तू तो शॉट…”; पाहा Video

गुजरातविरुद्ध दडपणाखाली रायुडूने ८ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १९ धावांची खेळी खेळली. त्याने मोहित शर्माच्या षटकात हे तिन्ही चौकार लगावले आणि चेन्नईला विजयानजीक नेले. सामन्यानंतर रायडूने धोनीबद्दल मोठे विधान केले.

IPL 2023: You will remember this shot you played even when you are old Rayudu told what Dhoni told him after the victory
सामना संपल्यानंतर अंबाती रायडूने चाहते आणि निकटवर्तीयांचे आभार मानले. सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने लांबलेल्या फायनलमध्ये चेन्नईने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. हा अंतिम सामना अंबाती रायडूच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. आयपीएल फायनल हा त्याचा शेवटचा सामना असेल असे रायुडूने फायनलपूर्वी जाहीर केले होते. सीएसकेच्या विजयानंतर रायुडू खूप भावूक दिसला आणि रडू लागला.

सीएसकेचा कर्णधार एम.एस. धोनी या सामन्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे अंबाती रायुडू मात्र अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केल्याप्रमाणे आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. रायुडूची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द मोठी राहिली आहे. सोमवारी सामना संपल्यानंतर त्याने चाहते आणि निकटवर्तीयांचे आभार मानले.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

अंबाती रायडूला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही कारण त्याने आपली कारकीर्द एका चांगल्या, भव्य विजयी नोटवर संपवली. रायुडूने गुजरातविरुद्ध दडपणाखाली एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ८ चेंडूंत १९ धावांची खेळी खेळली. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर तिन्ही चौकार लगावले आणि चेन्नईला दबावातून बाहेर काढले. सामन्यानंतर रायडूने सांगितले की, “महेंद्रसिंग धोनीने त्याच्या फलंदाजीचे कौतुक केले.”

हेही वाचा: IPL 2023 Champion CSK: २ चेंडू १० धावा! सामना जिंकताच धोनीने जड्डूला उचलले; थालाचे डोळे पाणावले, विजयानंतरच्या भावनिक क्षणांचा Video व्हायरल

चेन्नईचा स्टार खेळाडू रायुडू म्हणाला, “जेव्हा शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती, तेव्हा आम्ही सर्वजण डगआउटमध्ये आमच्या देवाची आठवण करत होतो. शेवटी एक परीकथेचा शेवट झाला. मी आणखी काही मागू शकलो नसतो. हे अविश्वसनीय आहे. या लीगमधील काही सर्वोत्कृष्ट संघांविरुद्ध खेळणे मी खरोखर भाग्यवान आहे. हा विजय मला आयुष्यभर लक्षात राहील.”

रायुडू पुढे म्हणाला, “गेल्या ३० वर्षातील माझ्या मेहनतीमुळे मला आनंद आहे की या नोटवर माझे करिअर संपले. मी माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या वडिलांचे आभार मानण्यासाठी हा क्षण घेऊ इच्छितो. त्यांच्याशिवाय मी आज इथे नसतो. जेव्हा आम्ही सामना जिंकलो तेव्हा धोनी मला म्हणाला होता की, हे शॉट्स तुम्हाला म्हातारे झाल्यावरही आठवतील.”

हेही वाचा: IPL 2023 Champion CSK: चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर जडेजाने रिवाबाला अन् धोनीने साक्षीला मारली मिठी, फॅमिली इमोशनचा Video व्हायरल

सामना संपल्यानंतर रायुडू पुढे म्हणाला, “हा एका अध्यायाचा शेवट आहे. मी अजून मागू शकत नाही. मला एका महान संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता मी आयुष्यभर हसू शकतो. मागच्या ३० वर्षांमध्ये मी जेवढी मेहनत घेतली, त्याचा शेवट अशा पद्धतीने झाला, याचा आनंद आहे. मी खरोखर माझे कुटुंब आणि खासकरून वडिलांना धन्यवाद म्हणू इच्छितो. त्यांच्याशिवाय हे साध्य होऊ शकले नसते.”

सामन्यात काय झाले?

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसकेला विजयासाठी गुजरातकडून २१५ झावांचे लक्ष्य मिळणार होते. पण स्टेडियममध्ये पाऊस आल्यामुळे पंचांकडून सीएसकेला विजयासाठी १५ षटकांमध्ये १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजा याने शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ षटकार आणि चौकार मारल्यामुळे सीएसकेने सामना जिंकला. अंबाती रायुडू देखील ८ चेंडूत १९ धावांचे योगदान देऊ शकला. रायुडूने सीएसकेच्या डावातील १३व्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि चौकार मारला, पण चौथ्या चेंडूवर झेलबाद देखील झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 14:23 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×